दारूबंदीसाठी कुरखेड्यातील नगरसेवक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:31+5:302021-02-17T04:43:31+5:30
जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, महिलांना विधवा व भावी पिढीला व्यसनी बनविणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी १९९२ मध्ये चळवळ उभी ...

दारूबंदीसाठी कुरखेड्यातील नगरसेवक सरसावले
जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, महिलांना विधवा व भावी पिढीला व्यसनी बनविणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी १९९२ मध्ये चळवळ उभी झाली. समाजसेवक, राजकीय नेते व अनेक गावांच्या प्रयत्नांतून अखेर १९९३ मध्ये जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. त्यामुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. गावातील तंट्यांचे प्रमाण कमी झाले. या दारूबंदीचे जिल्ह्याला अनेक फायदे झाले. दारूबंदी मजबूत करण्यासाठी हजाराहून अधिक गावांनी ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्याचप्रमाणे कुरखेडा नगर पंचायतीच्या १७ नगरसेवकांनी समर्थन पत्रावर स्वाक्षरी करीत जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. ऐतिहासिक दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणीदेखील शासनाकडे केली आहे.
कुरखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा आशाताई तुलावी, उपाध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक मनोज सिडाम, कलाम शेख, चित्रा गजबिये, अर्चना वालदे, स्वाती नंदनवार, दीपाली देशमुख, नागेश्वर फाये, अनिता बोरकर, जयश्री धाबेकर, शारदा उईके, उस्मानखाँ सलामखाँ पठाण, रामहरी उगले, संतोषकुमार भट्टड, नंदिता दखने, उमेश वालदे या १७ नगरसेवकांनी दारूबंदी मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.