कुरखेड्यात सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: June 24, 2016 01:56 IST2016-06-24T01:56:08+5:302016-06-24T01:56:08+5:30
येथील राणा प्रताप वार्डातील आपल्या घराच्या वऱ्हांड्यात झोपलेल्या वृध्द आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ...

कुरखेड्यात सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
कुरखेडा : येथील राणा प्रताप वार्डातील आपल्या घराच्या वऱ्हांड्यात झोपलेल्या वृध्द आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
आदिवासी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कंगला माझी संघटनेचे सदस्य सिताराम रावजी तुलावी (८०) हे घरी वऱ्हांड्यात एकटेच झोपले असताना अज्ञात इसमाने मोठा दगड त्यांच्याडोक्यावर मारला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते धनराज लाकडे, मनोज कोरेटी, साजन हारामी, जगदिश पोरेटी, पुरूषोत्तम तुलावी यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या तुलावी यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेचा पंचनामा कुरखेडा पोलिसांनी केला असून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)