कुरखेड्याचा हर्षल लोथे ठरला हवाई सफरचा मानकरी
By Admin | Updated: December 26, 2015 01:40 IST2015-12-26T01:40:21+5:302015-12-26T01:40:21+5:30
संस्काराचे मोती ‘जरा हटके’ - २०१५ या स्पर्धेचा लकी ड्रा नागपूर येथे नुकताच काढण्यात आला.

कुरखेड्याचा हर्षल लोथे ठरला हवाई सफरचा मानकरी
लकी ड्रामधील विजेते : जिल्ह्यातील ५८ विद्यार्थी ठरले पुरस्काराचे विजेते
गडचिरोली : संस्काराचे मोती ‘जरा हटके’ - २०१५ या स्पर्धेचा लकी ड्रा नागपूर येथे नुकताच काढण्यात आला. यात हवाई सफरसाठी कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी हर्षल मधुकर लोथे याची निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातून विविध शाळांचे ५८ विद्यार्थी या लकी ड्राच्या माध्यमातून पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. या स्पर्धेतील उर्वरित विजेत्यांची नावे २४ डिसेंबर २०१५ च्या लोकमत हॅलो गडचिरोलीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. लवकरच विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)