कुनघाडा रै. येथे भाग्यश्री भांडेकरचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:38+5:302021-06-22T04:24:38+5:30

यावेळी सुरेश भांडेकर, लीलाबाई भांडेकर,योगेश भांडेकर, वैष्णवी भाडेकर, युवा संकल्प ग्रुप चामोशी प्रमुख सूरज नैताम, कुनघाडा प्रमुख श्रीकृष्ण वैरागडे, ...

Kunghada Rai. Bhagyashree Bhandekar felicitated here | कुनघाडा रै. येथे भाग्यश्री भांडेकरचा सत्कार

कुनघाडा रै. येथे भाग्यश्री भांडेकरचा सत्कार

यावेळी सुरेश भांडेकर, लीलाबाई भांडेकर,योगेश भांडेकर, वैष्णवी भाडेकर, युवा संकल्प ग्रुप चामोशी प्रमुख सूरज नैताम, कुनघाडा प्रमुख श्रीकृष्ण वैरागडे, चामोशी उपप्रमुख प्रशांत चुदरी, सदस्य राहुल चिचघरे, अजय भांडेकर, स्वप्नील चिचघरे, रुचिक चिचघरे, नामदेव वासेकर, नितेश कोठारे, सचिन कुनघाडकर उपस्थित होते.

या बुद्धिबळ परीक्षेसाठी विविध गटांमध्ये खेळाडूंचे वर्गीकरण करण्यात आले होते. प्रथम गटामध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू तथा राज्य बुद्धिबळ पंच भाग्यश्री भांडेकर हिचा समावेश होता. या गटाला ग्रँडमास्टर अनुराग महामल, प्रफुल झावेरी यांनी मार्गदर्शन केले. १० ते १४ मार्च दरम्यान ऑनलाइन शिबिर घेण्यात आले हाेते. यात देशातून जवळपास तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू भाग्यश्री भांडेकर हिने घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत देशातून केवळ १७ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

===Photopath===

210621\img-20210621-wa0095.jpg

===Caption===

भाग्यश्री भांडेकर सत्कार फोटो

Web Title: Kunghada Rai. Bhagyashree Bhandekar felicitated here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.