जिल्हा परिषदेत भरला बदल्यांचा कुंभमेळा

By Admin | Updated: September 12, 2015 01:15 IST2015-09-12T01:15:05+5:302015-09-12T01:15:05+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत केंद्र प्रमुख, ...

Kumbh Mela of transfers in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत भरला बदल्यांचा कुंभमेळा

जिल्हा परिषदेत भरला बदल्यांचा कुंभमेळा

न्यायालयाच्या निर्णयावरून प्रक्रिया : १० टक्के बदल्यांसाठी जिल्हाभरातून बोलाविले शिक्षक
गडचिरोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. या बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेत दुसऱ्या दिवशीही शिक्षक व कर्मचाऱ्यांची तुडूंब गर्दी उसळली होती. केवळ १० टक्के बदल्या होणार असताना जिल्हाभरातून महिला व पुरूष शिक्षकांना बोलाविण्यात आल्याने जिल्हा परिषदेचा परिसर शिक्षकांच्या गर्दीनेच भरून गेला होता. पहिल्या दिवशी समुपदेशनाने केंद्र प्रमुखांच्या २५, शिक्षकांच्या ३३ व उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या २२ बदल्या करण्यात आल्या. शुक्रवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी ही माहिती दिली.
बदली प्रक्रियेवर मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता स्वत: जातीने लक्ष ठेवून होत्या. बदली प्रक्रियेकरिता जिल्हाभरातून शिक्षक जिल्हा परिषदेत दाखल झाल्याने अनेकांना जिल्हा परिषदेच्या मागील भागाकडून प्रवेश घ्यावा लागत आहे. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे सुरूवातीला अहेरी उपविभागातील पाच तालुक्यांमधील रिक्त असलेल्या जागा भरल्या जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Kumbh Mela of transfers in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.