कोरची दुचाकीला धडक, युवक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST2021-05-09T04:38:26+5:302021-05-09T04:38:26+5:30

या अपघातानंतर काही वेळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी घटनास्थळी पोहचून रुग्णाला मदतीचा हात दिला. प्राप्त ...

Korchi hit the bike, the youth seriously injured | कोरची दुचाकीला धडक, युवक गंभीर जखमी

कोरची दुचाकीला धडक, युवक गंभीर जखमी

या अपघातानंतर काही वेळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी घटनास्थळी पोहचून रुग्णाला मदतीचा हात दिला. प्राप्त माहितीनुसार, कार क्रमांक एमएच ३३, टी १२९७ हे गडचिरोलीवरून चामोर्शीकडे येत होते. यादरम्यान एमएच ३३, एए ५६२४ क्रमांकाचे दुचाकी वाहन तळोधीवरून गडचिरोलीकडे जात होते. नवेगाव रै ग्रामपंचायतसमोर दोन्ही वाहनांची टक्कर झाली. यात दुचाकी खाली कोसळून मोठ्या वाहनात घुसली. यात दुचाकीस्वार अतुल हुलके यांचा पाय व डोळ्याच्या भुवईला जबर मार लागला. कार चालकाला घटनेची माहिती कळताच जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी घटनास्थळी पोहोचून दुसरी गाडी बोलावली आणि जखमी युवकास गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. एवढेच नाही तर गडचिरोली पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. यावेळी नवेगावचे सरपंच डंबाजी खोबे, उपसरपंच दिनकर दुधबळे, ग्रापं सदस्य माधव खोबे व गावकऱ्यांनीही सहकार्य केले. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

Web Title: Korchi hit the bike, the youth seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.