कोंढाळा जि.प. शाळा होणार डिजिटल

By Admin | Updated: September 20, 2015 02:01 IST2015-09-20T02:01:09+5:302015-09-20T02:01:09+5:30

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकीज्ञान न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या धड्यांसोबतच विविध उपक्रमांचे गुण त्यांच्यात बिंबविण्यासाठी

Kondhala ZP School will be digital | कोंढाळा जि.प. शाळा होणार डिजिटल

कोंढाळा जि.प. शाळा होणार डिजिटल

उपक्रमांवर भर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न; मध्यान्ह भोजन भाजीपाल्यासाठी परसबाग फुलवली
मोहटोला/किन्हाळा : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकीज्ञान न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या धड्यांसोबतच विविध उपक्रमांचे गुण त्यांच्यात बिंबविण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जि.प. शाळा अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. शाळेत विविध उपक्रमांसह तंत्रज्ञान पूरक उपक्रम राबविले जात असल्याने शाळा डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे.
कोंढाळा गावाने आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. गावाच्या विकासासह शाळेच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत २९८ विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुलकलवार यांनी शाळा डिजिटल करण्याचा चंग बांधला आहे. शिवाय शाळेची गुणवत्ताही दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेच्या विकासासाठी गट शिक्षणाधिकारी बांगर, केंद्र प्रमुख विजय बन्सोड, विषय तज्ज्ञ अरविंद घुटके, राजेंद्र बांगरे, बी. एम. उईके प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Kondhala ZP School will be digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.