लालपरीत पुन्हा खटखट, निम्म्यापेक्षा अधिक तिकीट मशीन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:38 IST2021-07-28T04:38:05+5:302021-07-28T04:38:05+5:30
दहा वर्षांपूर्वी ट्रे मध्ये ठेेवलेले साधे तिकीट प्रवाशांना दिले जात हाेते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एसटीने इलेक्ट्राॅनिक तिकीट ...

लालपरीत पुन्हा खटखट, निम्म्यापेक्षा अधिक तिकीट मशीन बंद
दहा वर्षांपूर्वी ट्रे मध्ये ठेेवलेले साधे तिकीट प्रवाशांना दिले जात हाेते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एसटीने इलेक्ट्राॅनिक तिकीट मशीन खरेदी केल्या. प्रत्येक आगारात याच तिकीट मशीनने तिकीट दिले हाेते. काेराेनाचा माेठा फटका एसटीला बसला आहे. एसटीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गडचिराेली आगारात एकूण २०५ तिकीट मशीन हाेत्या. सद्य:स्थितीत केवळ ८० मशीन सुरू आहेत. एवढ्या मशीन पुरेशा नसल्याने जुन्याच पद्धतीने पुन्हा तिकीट द्यावे लागत आहे.
बाॅक्स
अनेक वेळा पाठपुरावा करूनही व्यर्थ
-बंद पडलेल्या काही मशीन चंद्रपूर, नागपूर, मुंबई येथे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. काही मशीन तर वर्ष उलटले तरी दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. यासाठी स्थानिक एसटी प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अजूनपर्यंत मशीन दुरुस्त करून पाठविण्यात आल्या नाहीत.
- ज्या कंपनीला मशीन दुरुस्तीचा करार देण्यात आला हाेता ताे करारही लवकरच संपणार आहे. एसटीची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. त्यामुळे नवीन करार करण्यास विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
पगार मिळताेय हेच नशीब
एसटीची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे, याची जाणीव एसटी कर्मचाऱ्यांना आहे. अशाही स्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत आहे. पगार मिळत आहे, हेच आमचे नशीब अशी प्रतिक्रिया काही एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाॅक्स
वाहकांची पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव
मागील दहा वर्षांपासून एसटीत तिकीट मशीनचाच वापर केला जात हाेता. त्यामुळे नवीन भरती झालेल्या वाहकांना ट्रे मधील तिकिटाचा हिशेब कसा करावा हे माहीत नाही. त्यामुळे मदतीसाठी तिकिटाचे दर असलेला कागद ते वापरत असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
काय म्हणते आकडेवारी
आगार एकूण मशीन बिघाड
गडचिराेली २०५ ८०
अहेरी १३६ ९९
--------------------------एकूण एसटी बस- १८१
एकूण तिकीट मशीन -३४१
सुरू तिकीट मशीन - १७९