पतंग महोत्सवाला कुरखेडा येथे सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:43+5:302021-01-16T04:40:43+5:30

कुरखेडा : शहरात मकरसंक्रांत निमित्त पतंग महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या हस्ते ...

Kite Festival begins at Kurkheda | पतंग महोत्सवाला कुरखेडा येथे सुरूवात

पतंग महोत्सवाला कुरखेडा येथे सुरूवात

कुरखेडा : शहरात मकरसंक्रांत निमित्त पतंग महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्याक्ष रवींद्र गोटेफोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंसी, सिनेट सदस्य चांगदेव फाये, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, माजी उपसरपंच अशोक कंगाली, जगदीश दखने,उल्हास देशमुख उपस्थित होते. ‘अ’ गटातील विजेत्याला ३००१ रू रोख तर उपविजेताला २००१ रुपये, ‘ब’ गटातील विजेत्या २००१ रुपये तर उपविजेत्याला १००१ रुपये रोख प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता आयोजक मंडळाचे अध्यक्ष शुभम गोटेफोडे, उपाध्यक्ष दुर्गेश मेश्राम, सचिव प्रवीण कुळसंगे, सहसचिव शुभम परिहार, कोषाध्यक्ष प्रणय धोटे, पिंटू ढोंगे व सदस्य सहकार्य करीत आहेत.

Web Title: Kite Festival begins at Kurkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.