शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तिवर्धन दीक्षित यांनी स्वीकारला कुलगुरूचा पदभार

By admin | Updated: October 13, 2014 23:19 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी आज सोमवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी आज सोमवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्याकडे विद्यापीठाचा पदभार सोपविला. ६ मार्च २०१४ रोजी गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून या विद्यापीठाचा कारभार सांभाळला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजिकुमार यांनी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडून १० आॅक्टोबर रोजी प्राप्त झालेला आदेश डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्या स्वाधीन केला. तसेच गोंडवाना विद्यापीठाचा कारभार यशस्वीरित्या व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांना शुभेच्छाही प्रदान केल्या. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर होते. प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा इन्स्टीट्युट आॅफ कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, वित्त अधिकारी बा. स. राठोड उपस्थित होते. यावेळी मावळते प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजिकुमार यांचा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा व माजी प्र- कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी गोंडवाना विद्यापीठाने अल्पावधीत केलेल्या कार्याची व विकासाची प्रशंसा केली. कार्यक्रमाला प्राचार्य कोरमचे अध्यक्ष डॉ. जे. ए. शेख, विद्यापीठातील विविध शाखांचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, प्राचार्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)