कीर्तिवर्धन दीक्षित यांनी स्वीकारला कुलगुरूचा पदभार
By Admin | Updated: October 13, 2014 23:19 IST2014-10-13T23:19:45+5:302014-10-13T23:19:45+5:30
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी आज सोमवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी

कीर्तिवर्धन दीक्षित यांनी स्वीकारला कुलगुरूचा पदभार
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी आज सोमवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्याकडे विद्यापीठाचा पदभार सोपविला.
६ मार्च २०१४ रोजी गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी प्रभारी कुलगुरू म्हणून या विद्यापीठाचा कारभार सांभाळला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजिकुमार यांनी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडून १० आॅक्टोबर रोजी प्राप्त झालेला आदेश डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांच्या स्वाधीन केला. तसेच गोंडवाना विद्यापीठाचा कारभार यशस्वीरित्या व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांना शुभेच्छाही प्रदान केल्या.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर होते. प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा इन्स्टीट्युट आॅफ कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, वित्त अधिकारी बा. स. राठोड उपस्थित होते. यावेळी मावळते प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजिकुमार यांचा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा व माजी प्र- कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी गोंडवाना विद्यापीठाने अल्पावधीत केलेल्या कार्याची व विकासाची प्रशंसा केली. कार्यक्रमाला प्राचार्य कोरमचे अध्यक्ष डॉ. जे. ए. शेख, विद्यापीठातील विविध शाखांचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, प्राचार्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)