मुलाने केली आईची निर्घृण हत्या
By Admin | Updated: April 2, 2015 01:43 IST2015-04-02T01:43:50+5:302015-04-02T01:43:50+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एका मुलाने आपल्या आईच्या डोक्यावर दंड्याने वार करून तिला जागीच ठार केल्याची घटना ...

मुलाने केली आईची निर्घृण हत्या
आलापल्ली : येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एका मुलाने आपल्या आईच्या डोक्यावर दंड्याने वार करून तिला जागीच ठार केल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
ग्रामपंचायत भवनाच्या मागील बाजूस बाजार वार्डात नारायण धानोरकर वास्तव्याला आहेत. त्यांच्या पत्नी वत्सलाबाई धानोरकर यांचा मुलगा सुनील (२३) याने दंडाच्या साहाय्याने आईच्या डोक्यावर जबर प्रहार केला व त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर तो ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर चढला. नागरिकांनी तत्काळ या पोलिसांना या घटनेची माहिंती दिली. तो टाकीवरून उतरला नाही, उलट त्याने टाकीच्या बाजुला असलेल्या एका कवेलुच्या घरावर उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.
मृतक वत्सलाबार्इंचे शव पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले व आरोपी सुनिलला वाहनात अहेरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या घटनेनंतर पाण्याच्या टाकीच्या परिसरात त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मृतक महिलेचे पती बाहेरगावी गेले होते. आरोपी सुनिल हा वेडसर असल्याने त्याने हे कृत्य केले असावे, अशी शक्यता आहे. (वार्ताहर)