गडचिराेली : प्रत्येक पालक मुलांचा हट्ट पुरविताे. हट्ट पुरविताना बरेचदा आराेग्यावरील दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते. दातांच्याही बाबतीत असाच काहीसा प्रकार घडताे. मुलांनी हट्ट केल्यानंतर पालक त्यांना चाॅकलेट्स अथवा गाेड पदार्थ घेऊन देतात. परंतु दातांना चिकटणारे चाॅकलेट्स अथवा गाेड पदार्थ तेवढेच धाेकादायक ठरतात. सकाळ व रात्री दातांची स्वच्छता न ठेवल्यास दातांना कीड लागते. त्यामुळे मुलांनी निराेगी दातांसाठी चाॅकलेट्स खाणे टाळावे.
गडचिराेली जिल्ह्यात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मुखराेग, मुखकर्कराेग तसेच हिरड्यांचे आजार गेल्या काही वर्षांत बळावले आहेत. वयाच्या सात ते आठ वर्षांपासूनच अनेक बालकांच्या दातांना कीड लागते. त्यानंतर लगेच उपचार न झाल्यास दातांच्या समस्या निर्माण हाेतात. त्यामुळे दातांची याेग्य वेळी काळजी घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच खानपान पद्धतीवरही लक्ष केंद्रित करून आराेग्यविषयक खबरदारी घ्यावी तेव्हाच दातांचे आराेग्य जपता येईल.
बाॅक्स ....
चाॅकलेट्स खावे कमी प्रमाणात
-लहान मुलांना तू चाॅकलेट्स खाऊ नकाे, असे म्हटल्यास ते शक्य हाेणार नाही. परंतु चाॅकलेट्स खाल्ल्यानंतर वेळीच दातांची स्वच्छता करता येते.
- लहान मुले दिवसात अधूनमधून चाॅकलेट्स खात असतील तर दातांना चिकटलेले चाॅकलेट्स अन्य पदार्थ खाल्ल्यानंतर निघून जाईल. परंतु रात्री ब्रश न करताच झाेपी गेल्यास दातांना चिकटून राहिलेले चाॅकलेट कीड निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
बाॅक्स ...
अशी घ्या दातांची काळजी
- विशेषत: लहान मुलांनी पदार्थ खाताना आपल्या दाताच्या आराेग्यासाठी सदर पदार्थ याेग्य आहे काय, याचा विचार पालकांनी करावा.
- सकाळी उठल्यानंतर व रात्री झाेपण्यापूर्वी दात घासावे. दिवसातून अधूनमधून चूळ (गुळणी) भरावी. चिकटणारे पदार्थ खाणे टाळावे.
बाॅक्स ....
लहानपणीच दातांची कीड
- लहान मुले चालायला लागल्यानंतर चाॅकलेट्सच्या आहारी जातात. मुले रडल्यानंतर पालकच त्यांना चाॅकलेट घेऊन देत असल्याने मुलांनाही चाॅकलेट्स खाण्याची सवय लागते. त्यानंतर वयाच्या सात ते आठ वर्षांपर्यंत बऱ्याच मुलांचे दात किडतात.
- विशेषत: दाढांना कीड लागते. दातांची याेग्य प्रकारे स्वच्छता राखली जात नसल्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे लहान मुलांना पालकांनी चिकटणाऱ्या चाॅकलेट्सपासून दूर ठेवावे. तसेच पर्यायी पदार्थ खाण्यास द्यावे.
बाॅक्स .....
ज्येष्ठांना मधुमेह व हृदयविकाराचा धाेका
मुखराेग, मुख कर्कराेग, ताेंड येणे, आग हाेणे, हिरड्या सुजणे, ताेंड बंद हाेणे, जखमा हाेणे, मसल कडक हाेणे, यासारख्या समस्या उद्भवल्यास ताेंडामध्ये जिवाणू वाढतात. याचा परिणाम युवकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आराेग्यावर हाेताे. जीवाणू वाढल्यास हृदयविकाराचा धाेका असताे तर मुखराेगामुळे मधुमेही रुग्णांना त्रास हाेण्याची शक्यता सर्वाधिक असते.
काेट .......
मजबूत व आराेग्यदायी दात ठेवण्यासाठी सकाळी व रात्री ब्रश करावा. दातांमध्ये काड्या टाकू नये. दात स्वच्छ करण्यासाठी दंत धाग्याचाच वापर करावा. विशेषत: बेकरी, फास्टफुड धाेकादायक असल्याने ते टाळावे. आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर नियमित करावा. त्यामुळे दातांचे आराेग्य याेग्य प्रकारे राखण्यास मदत हाेते. अबालवृद्धांसह सर्वांनी किमान सहा महिन्यानंतर दातांची चिकित्सा दंततज्ज्ञांकडून करावी. तेव्हाच आयुष्याच्या शेवटपर्यंत दात साथ देतात.
- डाॅ. चेतन काेवे, दंतचिकित्सक