विज्ञानाची कास धरा

By Admin | Updated: December 3, 2015 01:46 IST2015-12-03T01:45:35+5:302015-12-03T01:46:37+5:30

चामोर्शी शहरात अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन राज्यात तसेच परदेशात नोकरी करीत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेऊन नियमित अभ्यास करून

Keep the science alive | विज्ञानाची कास धरा

विज्ञानाची कास धरा

चामोर्शीत प्रदर्शनीचे बक्षीस वितरण : अतुल गण्यारवार यांचे आवाहन
चामोर्शी : चामोर्शी शहरात अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन राज्यात तसेच परदेशात नोकरी करीत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेऊन नियमित अभ्यास करून अभ्यासूवृत्ती बाळगावी तसेच विज्ञान प्रदर्शनीतील प्राप्त गुणातून विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले.
चामोर्शी येथील कृषक हायस्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बुधवारी ते बक्षीस वितरक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे होत्या. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वासेकर, गटशिक्षणाधिकारी पी. एम. सहारे, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी कडते, दीपक देवतडे, केंद्रप्रमुख सिल, परीक्षक प्रा. भोयर, प्रा. स्वर्णकार, दुरबुडे उपस्थित होते. प्रदर्शनीत प्राथमिक गट आदिवासी विभागातून प्रथम संजीवनी बर्लावार जि. प. शाळा मुंजेगाव, प्राथमिक गैर आदिवासी गटातून प्रथम क्रमांक अशित सरकार जि. प. शाळा विक्रमपूर, द्वितीय क्रमांक प्रशांत गंगाधर नवघरे जि. प. शाळा चाकलपेठ, तृतीय क्रमांक प्रतीक येरमवार महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी, माध्यमिक विभाग आदिवासी गटातून प्रथम करिश्मा आत्राम आश्रमशाळा गुंडापल्ली, गैर आदिवासी गटात प्रथम चेतन बाळराजे कॉरमेल अ‍ॅकेडमी चामोर्शी, द्वितीय रोशन नंदाजी मांडवगडे कृषक हायस्कूल चामोर्शी, तृतीय एकता थेरकर सम्राट अशोक विद्यालय मुधोली (रिट), शिक्षक गटातून प्रथम एस. टी. उराडे शंकरपूर, एल. एच. पिपरे कृषक हायस्कूल, प्रयोगशाळा परिचर गटात पी. एस. ब्रामणकर भगवंतराव आश्रमशाळा गुंडापल्ली यांनी सुयश प्राप्त केले. संचालन संजय कुनघाडकर तर आभार वर्षा लोहकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Keep the science alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.