मुख्यालयी राहून कर्तव्य बजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 01:07 IST2016-03-21T01:07:09+5:302016-03-21T01:07:09+5:30

शनिवारी मुलचेरा येथे ग्रामीण रूग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी

Keep duty at headquarters | मुख्यालयी राहून कर्तव्य बजावा

मुख्यालयी राहून कर्तव्य बजावा

शनिवारी मुलचेरा येथे ग्रामीण रूग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर, राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शिवसेना संपर्कप्रमुख किशोर कन्हेरे, अजय स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. कांचन जगताप, जि. प. सदस्य छाया कुंभारे, सतीश निमगडे, नायब तहसीलदार समशेर पठाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वीरेंद्र खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, नीलकमल मंडल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गरोदर मातांची प्रसूती आरोग्य सस्थेतच झाली पाहिजे, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, माता व बाल मृत्यू, उपजत व अर्भकमृत्यू कमी करण्यासाठी माता व बालकांचे ट्रॅकिंग करणे आवश्यक आहे. शव वाहिनीची मागणी पूर्ण करून मुलचेरा रूग्णालयाला येत्या तीन महिन्यात एक अतिरिक्त १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही ना. डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.
आरोग्य सेवेच्या कामात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास शासन संबंधितांवर कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, जिल्ह्याच्या आरोग्य विभागात ३५ टक्के जागा रिक्त आहे. त्यामुळे अनेक रूग्णांना आपला जीव गमावण्याची पाळी आली. केवळ इमारतीने आरोग्याचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, संचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण किलनाके यांनी केले तर आभार विनोदकुमार आडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मंचावर स्थान नाही
रूग्णालय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, पं.स. सभापती, सदस्य तसेच स्थानिक नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मंचावर स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी या कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाच्या मंचावर शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सदर कार्यक्रम शासकीय की राजकीय असा प्रश्न अनेकांनी कार्यक्रमस्थळी आपसात बोलून दाखविला.

पालकमंत्री दीड तास उशिरा पोहोचले
४मुलचेरा ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाची नियोजित वेळ सकाळी ११ वाजताची होती. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत सकाळी ११.३० वाजता मुलचेरा येथे पोहोचले. लगेच त्यांनी ग्रामीण रूग्णालयाचे उद्घाटन केले. कार्यक्रमस्थळी पालकमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती. कार्यक्रमाची सुरूवात होऊन मान्यवरांचे भाषण आटोपले. शेवटी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांचे भाषण सुरू असताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम दुपारी १२.४५ वाजता कार्यक्रमस्थळी हजर झाले.

पालकमंत्र्यांच्या आगमनानंतर मान्यवरांचे स्वागत
४मुलचेरा येथील नव्या ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वेळेवर उपस्थित झाले नाही. त्यामुळे आयोजकांनी प्रमुख पाहुण्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम थांबवून ठेवला होता. मंचावरील सर्व मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात असताना पालकमंत्री कार्यक्रमस्थळी आले. पालकमंत्र्यांच्या भाषणापूर्वी मंचावरील उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अहेरी येथील कार्यक्रम आटोपून मुलचेरा येथे येण्यास उशीर झाल्यामुळे पालकमंत्री आत्राम यांनी आपल्या भाषणात सर्वांची माफी मागितली.

प्रत्येक ग्रामीण रूग्णालयाला शववाहिनी देणार
४एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथील संदीप तोंदे पोटावी याचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून तोंदे पोटावी यांना शववाहिनी न मिळाल्याने आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर न्यावा लागला. या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली होती. या गंभीर बाबीची दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात शववाहिनी लवकरच पुरविणार, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.

सामान्य रूग्णालयातील व्यवस्थेचा घेतला आढावा
४राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुलचेरा, आष्टी दौऱ्यावरून गडचिरोलीत आल्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रूग्णालयातील प्रत्येक वॉर्डात जाऊन पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व रूग्णालयातील वर्ग १ ते ४ च्या रिक्त जागा दोन महिन्यात भरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Keep duty at headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.