पर्यावरणाचे संतुलन राखा
By Admin | Updated: July 6, 2017 01:44 IST2017-07-06T01:44:06+5:302017-07-06T01:44:06+5:30
गडचिरोली जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर व मोठ्या शहरांमध्ये औद्योगिकीकरण प्रचंड वाढल्याने प्रदूषणही झपाट्याने वाढले आहे.

पर्यावरणाचे संतुलन राखा
अशोक नेते यांचे आवाहन : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर व मोठ्या शहरांमध्ये औद्योगिकीकरण प्रचंड वाढल्याने प्रदूषणही झपाट्याने वाढले आहे. मोठमोठ्या इमारती, वाहनांची वाढती संख्या, कारखाने यामुळे माणसाला शुध्द आॅक्सीजन मिळणे कठीण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातही काळानुरूप अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच गडचिरोलीतील नागरिकांनी पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रासेयो विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोनकुंवर, जि.प. सदस्य विद्या आभारे, न.प. सभापती केशव निंबोळ, नगरसेवक संजय मेश्राम, वर्षा बट्टे, रंजना गेडाम आदी उपस्थित होते.