शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

कठाणी लागला मार्गी; पर्लकोटाचा पूल कागदावरच

By admin | Updated: June 5, 2015 01:40 IST

भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे.

भामरागड : भामरागड गावाजवळ आलापल्ली-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीचा ठेंगणा व अरूंद पूल उंच करण्याचे आश्वासन शासनाने २००६ पासून दिलेले आहे. मात्र गडचिरोली लगतच्या कठाणी नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले. राज्यपालांचा दत्तक असलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटाच्या पूल बांधकामाकडे शासनाकडे पुन्हा दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांमध्ये पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधीविषयी कमालीचा असंतोष वाढला आहे.
२००६-०७ मध्ये महापुरानंतर भामरागडवासीयांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्वत: आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे ही उपस्थित होते. विलासराव देशमुख यांनी भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २०१० मध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आर. आर. पाटील यांनी स्वीकारली. अनेकदा त्यांनी भामरागडला भेटी दिल्या. पालकमंत्री असताना नागपूर येथे रवी भवनात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्लकोटा व कठाणी नदीचा पूल उंच करण्यासाठी काम सुरू करा, असे आदेश दिले होते. निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे आश्वासनही ना. पाटील यांनी दिले होते. मात्र गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीचा पूल उंच करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. या कामासाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका असूनही येथील नवीन पूल बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. हा अरूंद व ठेंगणा पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा सरासरी दोन महिने संपर्क तुटून राहतो. अनेकदा मागणी करूनही या पुलाचे काम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सरकारप्रती कमालीचा असंतोष वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भामरागड तालुका हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. मात्र आजवर शासनाचे व प्रशासनाचे भामगरागड तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने भामरागड तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नावर अनेकदा शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याच्या प्रश्नाबाबतही मागणी करण्यात आली. परंतु शासनाचे भामरागडच्या विकासाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
- रघुनाथ तलांडे, संस्थापक अध्यक्ष, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती