कन्नमवार यांचे राजकीय कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:52+5:302021-01-13T05:34:52+5:30

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना अल्पावधीत राज्याच्या विकासासाठी अनेक चांगले ...

Kannamwar's political work is inspiring | कन्नमवार यांचे राजकीय कार्य प्रेरणादायी

कन्नमवार यांचे राजकीय कार्य प्रेरणादायी

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना अल्पावधीत राज्याच्या विकासासाठी अनेक चांगले व धोरणात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची त्यांना तळमळ होती. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या कार्याची छाप पाडली. त्यांचे राजकीय कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ९ जानेवारी रोजी स्थानिक इंदिरा गांधी चौकात बेलदार तत्सम समाज संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने माजी मुख्यमंत्री दादासाहेेब कन्नमवार यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बाेलत हाेते. कर्मवीर दादासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन त्यांनी केले. याप्रसंगी गंगाधर कात्रटवार, बेलदार समाज तत्सम संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष प्रा. राजेश कात्रटवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हा अध्यक्ष प्रकाश शंखदरबार, अजय तुम्मावार, महेश बोरेवार, सुनील बंडीवार, नितीन चंबुलवार, प्रवीण तेडलावार, मनोज मुप्पीडवार, सुनील भुरेवार, मधुकर बोडुवार, रमेश अग्गुवार, कल्पक मुप्पीड़वार आणि बेलदार समाजबांधव मोठ्या उपस्थित होते.

फाेटाे : स्व. दादासाहेब कन्नमवार यांना अभिवादन करताना ना. राजेंद्र यड्रावकर.

Web Title: Kannamwar's political work is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.