कमल हिडामी रक्षक दल सदस्य

By Admin | Updated: August 30, 2015 01:15 IST2015-08-30T01:15:49+5:302015-08-30T01:15:49+5:30

२५ आॅगस्ट रोजी मंगळवारी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध मोहीम राबविताना सायंकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली.

Kamal Hidami Rakshak Dal member | कमल हिडामी रक्षक दल सदस्य

कमल हिडामी रक्षक दल सदस्य

पोलिसांची माहिती : सीपीआयकडून पोलीस कारवायांवर प्रतिबंधाचा प्रयत्न
गडचिरोली : २५ आॅगस्ट रोजी मंगळवारी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध मोहीम राबविताना सायंकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत कमल हिडामी हा जखमी झाला होता. जखमी अवस्थेत शस्त्रासह अटक झालेला कमल हिडामी हा देखील नक्षल संघटनेमध्ये एरिया रक्षक दल सदस्य असल्याचे रेकॉर्ड व माहिती पोलीस विभागाकडे आहे. त्यामुळे कमल हिडामी हा नक्षल संघटनेमध्ये एरिया रक्षक दल सदस्य आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस विभागाने दिली आहे.
दिवसेंदिवस कमजोर होत चाललेल्या नक्षल चळवळीला गतवैभव मिळावे या उद्देशाने नक्षली नेते नवनवी रणनीती वापरत आहे. ज्यात नक्षल संघटनमधील ग्रामस्तराचे संघटन सदस्यांना नक्षल दलमच्या सुरक्षा व्यवस्थेकरिता साध्या वेशात ठेवून गुप्त वार्ता संग्रह, येणाऱ्या जाणाऱ्या इसमांवर तसेच पोलीस हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी या सदस्यांचा वापर करीत असतात. प्रसंगी नक्षल दलम पोलीस पथक मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्यावर हल्ला चढविणे तसेच पोलीस कारवायांवर प्रतिबंध आणावयाच्या दृष्टीने साध्या वेशातील नक्षली व संघटन सदस्य रणनीती वापरत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
मुरकुटी जंगल परिसरातील नक्षल चकमकीदरम्यान जखमी झालेला कमल हिडामी हा घटना घडली त्यावेळी सदर परिसरात साध्या वेशात शस्त्रासह नक्षल दलमसोबत काम करीत होता, असेही पोलिसांनी म्हटले आहे. फ्रन्टल आॅर्गनायझेशन जखमी कमल हिडामी याच्याविषयी जी काही तथ्ये पुढे करीत आहे, ते निराधार असल्याचे घटनेचे स्वरूप पाहता वाटत आहे. तपासाअंती या मुद्याची वस्तूस्थिती निश्चितच पुढे येणार आहे. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) हा सशस्त्र नक्षलवादी ग्रुप बंदुकीच्या जोरावर राज्यसत्ता हस्तगत करण्यासाठी हिंसक कारवाया करीत आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Kamal Hidami Rakshak Dal member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.