कढोली-सावलखेडा जि. प. पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
By Admin | Updated: August 30, 2016 01:08 IST2016-08-30T01:08:39+5:302016-08-30T01:08:39+5:30
कुरखेडा तालुक्यातील कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा हनुमंत

कढोली-सावलखेडा जि. प. पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा हनुमंत गावतुरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या अश्विनी गावतुरे यांचा ४७८ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या वर्षा गावतुरे यांना २ हजार ९७०, शिवसेनेच्या अश्विनी जगदीश गावतुरे यांना ४ हजार ९९२ तर भाजपच्या गायत्री ऋषीकेश आकरे यांना १ हजार ६३९, राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगीता श्यामकांत बोरकर यांना १ हजार ५५४ मते मिळाली. १६३ मतदारांनी नोटाचा वापर केला.
या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांनी मुख्य प्रचारकाची भूमिका पार पाडली. काँग्रेसच्या विजयासाठी तालुका काँग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, पं. स. सदस्य महादेव पाटील नाकाडे, पं. स. सभापती श्यामीना उईके, वडसा तालुका काँग्रेस अध्यक्ष परसराम टिकले, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, तुळशिराम बोगा, माधव दहिकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वर्षा गावतुरे यांच्या विजयानंतर जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन कुरखेडा येथे जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर वर्षा गावतुरे यांचे स्वगाव असलेल्या कढोली येथेही कार्यकर्त्यांनी रॅली काढली. काँग्रेसच्या पदरात जिल्हा परिषदेची जागा पडल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)