कबड्डीसाठी आलाय जिल्ह्यात नवा गुरू!
By Admin | Updated: July 14, 2014 23:58 IST2014-07-14T23:58:33+5:302014-07-14T23:58:33+5:30
मैदानी खेळांकडे शाळकरी मुलांसह क्रीडा मंडळांचेही गेल्या काही वर्षात दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मैदानी खेळ म्हणून महाराष्ट्राच्या मातीत कबड्डी अग्रक्रमाने खेळले जाते. मात्र नक्षलग्रस्त गडचिरोली

कबड्डीसाठी आलाय जिल्ह्यात नवा गुरू!
गोड बातमी : नक्षलग्रस्त जिल्ह्यातील खेळाडूंना देणार विशेष मार्गदर्शन
गडचिरोली : मैदानी खेळांकडे शाळकरी मुलांसह क्रीडा मंडळांचेही गेल्या काही वर्षात दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मैदानी खेळ म्हणून महाराष्ट्राच्या मातीत कबड्डी अग्रक्रमाने खेळले जाते. मात्र नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कबड्डीच्या खेळासाठी शाळा, क्रीडा, मंडळ, महाविद्यालय यांची उदासीनता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात कबड्डीला पुनर्वैभव मिळून देण्यासाठी एक स्वतंत्र कोच नियुक्त केला आहे. हा कोच जिल्हा मुख्यालयाच्या क्रीडा अकादमीतून जिल्ह्यातील चांगल्या कबड्डीपटूंना नवे धडे देणार आहे. यासाठी कबड्डी खेळात भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, तरूण यांना एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या क्रिकेट या एकमेव मैदानी खेळाचे आयोजन गावागावात केले जाते. या खेळाच्या आयोजनासाठी राजाश्रय मोठ्या प्रमाणावर मिळतो. कबड्डी या खेळाला पूर्वी आदिवासीबहूल भागात मोठी डिमांड होती. परंतु शाळा, महाविद्यालयांनी कबड्डी खेळाकडे गेल्या काही वर्षात पाठ फिरविली आहे. कबड्डी खेळाचे आयोजनही फार कमी प्रमाणात केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातून कबड्डीचे खेळाडू निर्माण होणे बंद झाल्यासारखेच आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने कबड्डी या खेळासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता विशेष प्रशिक्षक नियुक्त केला आहे. सदर प्रशिक्षक गडचिरोली क्रीडा विभागात रूजू झाले आहे. जिल्ह्यातील कबड्डी खेळाच्या खेळाडूला ते आता नव्या तंत्राने धडे देतील. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील आदिवासी, गैर आदिवासी विद्यार्थ्यांना कबड्डी खेळाबाबत आवड निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र त्याला व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये शाळांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या कबड्डी स्पर्धा घेतल्या जातात. यापलिकडे फारसे काम होताना दिसत नाही.