शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेचे औचित्य; आस्था व औषधी गुणसंपन्नतेमुळे वटवृक्ष पूजनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:13 IST

Gadchiroli news वटसावित्रीच्या दिवशी महिला आस्थेने वडाच्या झाडाची पूजा करून झाडाच्या सभोवताली धागा गुंडाळतात. यातून वटवृक्षाच्या संवर्धनाचा संदेश तर मिळताे शिवाय पारंपरिक रीतिरिवाज जाेपासला जाऊन औषधी गुणधर्म असलेल्या झाडाचे संवर्धन हाेते. त्यामुळेच वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

ठळक मुद्देमहिलांचे आरोग्य जपणारा हा वटवृक्ष आयुर्वेदात खास महत्त्वाचा आहे. वृक्षाच्या पारंबीपासून मुळापर्यंत आणि फुलापासून फळापर्यंत प्रत्येक अवयव आरोग्यवर्धक आहे. या वृक्षात अनेक औषधी गुण दडले आहेत. आरोग्यवर्धक गुण व अध्यात्म या संयोगातून उत्सव साजरा होतो.

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : औषधी गुणसंपन्न असल्याने वडाच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच त्याला ‘वटवृक्ष’ असे सुद्धा संबोधले जाते. वटसावित्रीच्या दिवशी महिला आस्थेने वडाच्या झाडाची पूजा करून झाडाच्या सभोवताली धागा गुंडाळतात. यातून वटवृक्षाच्या संवर्धनाचा संदेश तर मिळताे शिवाय पारंपरिक रीतिरिवाज जाेपासला जाऊन औषधी गुणधर्म असलेल्या झाडाचे संवर्धन हाेते. त्यामुळेच वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वटपौर्णिमेचा दिवस जसा महिलांसाठी सौभाग्याचा, तसाच वटवृक्षासाठीही अत्यंत भाग्याचा. वर्षातून केवळ एकदाच पूजला जाणारा हा वृक्ष इतर वेळी मात्र दुर्लक्षित राहतो. वडाच्या झाडाखाली गतप्राण झालेला सत्यवान पुन्हा जिवंत झाला होता, ही सावित्रीची पौराणिक कथा सर्वांनीच ऐकलेली. वटपौर्णिमेला विवाहित महिला वडाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला सुताचे फेरे घालतात, ही परंपराही अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे, मात्र यामागच्या शास्त्रीय कारणांचा शोध खूप कमी लोकांनी घेतलेला.

पूर्वीच्या काळी ना गॅस, ना इंडक्शन शेगडी. माजघरातल्या भडकत्या चुलीसमोरच प्रत्येक महिला राबत असायची. डोळ्यात पाणी अन् श्वासात धूर. अशावेळी त्यांना गरज असायची शुद्ध हवेची, ऑक्सिजनची. त्यासाठी वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना महिला वडाच्या झाडाजवळ थांबल्या तरी आरोग्यात फरक पडायचा.

वडाचे आयुर्वेदातील महत्त्व

वडाचे वृक्ष हे प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मामुळे ओळखल्या जाते. वडाच्या वृक्षाची पाने, दूध (चीक), मुळे व फांद्या औषधी गुणधर्मयुक्त आहेत. वडाचे झाड हे अ‍ॅन्टी ऑक्साईड दुखण्यावर, अतिसार, मधुमेह, त्वचाविकार यासारख्या आजारावर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार वडाच्या झाडाचे अर्क हे गर्भवती स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत जर टाकले तर त्या स्त्रीचे आरोग्य उत्तम राहते व होणारे बाळ हे दीर्घायुषी होते. वडाच्या झाडापासून घरगुती औषधीसुद्धा बनविता येते.

वडाच्या झाडाची पाने ही त्वचेवरील फोड, सांधेदुखी, सांधे सुजणे, त्वचाविकार यावर उपयुक्त आहे. वडाच्या झाडाचे दूध हे तोंडाचा दुर्गंध, दात हलणे, रक्तार्श (मूळव्याध), डोळ्याचे आजार, पायाला भेगा पडणे, सांधेदुखी यावर उपयुक्त आहे. वडाच्या झाडाचे मूळ हे अतिसार, पिंपल, केसाचे विकार यावर उपयुक्त आहे. वडाच्या झाडाच्या फांद्या मुखाचा अल्सर, तोंडाचा दुर्गंध, वारंवार लघवी लागणे, त्वचाविकार यावर उपयुक्त आहे. वडाचे वृक्ष हे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे आहे.

पूजा व सूत गुंडाळण्याचे पौराणिक महत्त्व

सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळाल्याने ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्रीने ज्याप्रमाणे सत्यवानासाठी व्रत करून त्याचे प्राण परत मिळविले, अशी पौराणिक मान्यता आहे. महिला त्याप्रमाणेच वटसावित्री व्रत आचरतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीला स्मरून आयुष्य वाढविण्यासाठी याचना करतात.

वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायूमंडलात प्रक्षेपित करतात, असा समज आहे. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सूत गुंडाळले जाते, त्यावेळी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील तत्त्वांच्या संयोगामुळे लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात, असेही मानले जाते. वटवृक्ष दीर्घायुषी असल्याने महिला सुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम