सामान्य जनतेला न्याय मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:24 IST2017-08-26T23:24:16+5:302017-08-26T23:24:36+5:30
समाजातील सामान्य व्यक्ती आजही कायदेविषयक माहितीपासून अनभिज्ञ आहेत. किरकोळ वादविवाद घेऊन ते पोलीस ठाण्यात येतात.

सामान्य जनतेला न्याय मिळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : समाजातील सामान्य व्यक्ती आजही कायदेविषयक माहितीपासून अनभिज्ञ आहेत. किरकोळ वादविवाद घेऊन ते पोलीस ठाण्यात येतात. त्यामुळे पोलिसांचेही काम वाढते. शेवटी कोर्टात जातात. सर्वसामान्य लोकांना कोर्टात येणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे सर्वांना स्थानिक पातळीवर कायदेविषयक माहिती असावी, सर्वसामान्यांना न्याय स्थानिक पातळीवर मिळावा, असे प्रतिपादन न्या. के. आर. सिंघेल यांनी केले.
पोलीस ठाण्यात तालुका विधीसेवा समितीच्या वतीने विधीसेवा चिकित्सालय केंद्राचे उद्घाटन बुधवारी न्या. के. आर. सिंघेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, देसाईगंज बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एन. डी. वारजुरकर, सहायक सरकारी वकील एम. के. फुले, अॅड. लाँगमार्च खोब्रागडे, अॅड. अतुल उईके, अॅड. पिलारे, पॅरा लिगल व्हॅलेंटियर प्रा. प्रभाकर गोबाडे, प्रा. कैैलास बडवाईक, अरूण कुंभलवार, प्रा. कहूरके, एपीआय अतुल तवाडे, टारपे उपस्थित होते. संचालन अॅड. लाँगमार्च खोब्रागडे तर आभार अॅड. अतुल उईके यांनी मानले.