गृहरक्षकासाठी जंबो भरती होणार
By Admin | Updated: August 12, 2016 00:53 IST2016-08-12T00:53:33+5:302016-08-12T00:53:33+5:30
गडचिरोली जिल्ह्यात होमगार्ड (गृहरक्षक) पदासाठी ९० जागांची भरती विविध उपविभागांतर्गत केली जाणार आहे.

गृहरक्षकासाठी जंबो भरती होणार
१७ ला पोलीस मैदानावर चाचणी : ७३ पुरूष व १७ महिला निवडणार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात होमगार्ड (गृहरक्षक) पदासाठी ९० जागांची भरती विविध उपविभागांतर्गत केली जाणार आहे. यात ७३ जागा पुरूषांसाठी तर १७ जागा महिलांसाठी राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.
गडचिरोली, अहेरी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा या पथक/उपपथकामध्ये पुरूष व महिला उमेदवारांची होमगार्ड सदस्य नोंदणी १७ आॅगस्ट २०१६ ला पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील मैदानावर सकाळी ७ वाजतापासून घेण्यात येणार आहे. निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार वेतनीसेवेत असतील. त्यांनी वेतनीसेवेत असल्याबद्दल कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चरित्र पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र (शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे) माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक, आयटीआय, खेळाडू व इतर अन्य तपशीलाचे पुष्टयार्थ सर्व संबंधित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवार नोंदणीच्या वेळी उमेदवारांना स्वखर्चाने यावे लागेल व अपघात झाल्यास याची जबाबदारी उमेदवाराची राहिल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित राहणार आहे, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराची एक संधी उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)
या आहेत गृहरक्षक भरतीसाठी पात्रता
वय २० ते ५० च्या दरम्यान असावे, शिक्षण किमान १० वी पास, उंची पुरूष १६२ सेमी, महिला १५० सेमी, छाती फक्त पुरूष उमेदवारांकरिता न फुगविता ७६ सेमी, फुगवून ८१ सेमी कमीतकमी, शारीरिक दृष्ट्या पात्र असावा, कोणताही गुन्हा दाखल नसावा, बेरोजगार व्यक्तीही विद्यार्थी होमगार्ड नोंदणीसाठी अपात्र असतील, उमेदवार स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी असावा, उमेदवारास विहीत केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक अशी शारीरिक चाचणी द्यावी लागेल. पुरूषांना १६०० मीटर कमीतकमी ०५ मी १० सेकंद, महिला ८०० मीटर कमीतकमी ३ मिनिट ५० सेकंद गोळा फेक, पुरूष ०८.५० मीटर, महिला ०.६ मीटर.