रुग्ण सेवेने द्विगुणीत झाला आराेग्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST2020-11-21T05:00:00+5:302020-11-21T05:00:16+5:30
दिवाळी हा भारतातील सर्वात माेठा सण आहे. हा सण कुटुंबासाेबतच साजरा करण्याची अनेकांची इच्छा राहते. याला आराेग्य कर्मचारीही सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यावर्षी काेराेनाचे संकट कायम असल्याने कर्तव्यावर असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण कुटुंबासाेबत साजरा करता आला नाही. एकदा काेराेना वाॅर्डात नियुक्ती झाल्यानंतर सलग पाच दिवस त्याच वाॅर्डात नेमणूक दिली जाते. त्यानंतर दाेन दिवसांच्या सुट्या देऊन नाॅन काेविड वाॅर्डात नेमणूक केली जाते.

रुग्ण सेवेने द्विगुणीत झाला आराेग्य कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना वाॅर्डात काम करीत असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्या मिळाल्या नाहीत. या कर्मचाऱ्यांनी रुग्णांसाेबत दिवाळीचा सण साजरा करून आनंद लुटला.
दिवाळी हा भारतातील सर्वात माेठा सण आहे. हा सण कुटुंबासाेबतच साजरा करण्याची अनेकांची इच्छा राहते. याला आराेग्य कर्मचारीही सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यावर्षी काेराेनाचे संकट कायम असल्याने कर्तव्यावर असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण कुटुंबासाेबत साजरा करता आला नाही. एकदा काेराेना वाॅर्डात नियुक्ती झाल्यानंतर सलग पाच दिवस त्याच वाॅर्डात नेमणूक दिली जाते. त्यानंतर दाेन दिवसांच्या सुट्या देऊन नाॅन काेविड वाॅर्डात नेमणूक केली जाते. ज्या आराेग्य कर्मचाऱ्यांची काेराेना वाॅर्डात दिवाळीच्या कालावधीत नेमणूक हाेती अशांना दिवाळी सण रुग्णालयातच साजरा करावा लागला.
रुग्णांना आपले कुटुंब सदस्य माणून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांनी दिवाळीची भेट म्हणून रुग्णांना दिवाळीचा फराळ व गाेडधाेड दिले. कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांना सुद्धा आराेग्य कर्मचाऱ्यांमुळे दिवाळीचा आनंद घेता आला.
नवीन अनुभव
दिवाळी सणाच्या दिवशी कुटुंबापासून दूर राहण्याचा हा आपल्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे मन काही प्रमाणात खिन्न झाले हाेते. मात्र आराेग्य कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ दिला. आराेग्य कर्मचाऱ्यांमुळे मनातील उदासीनतेची भावना कमी हाेण्यास मदत झाली.
प्रत्येक डाॅक्टर व आराेग्य कर्मचारी रुग्णांच्या सेवेला प्रथम स्थान देते. यावर्षी काेराेनाचे संकट असल्याने अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना कुटुंबासाेबत दिवाळी साजरी करता आली नाही. मात्र रुग्णांच्या सेवेत दिवाळीचे दिवस कसे गेले, याचा पत्ता लागला नाही.
-शंकर ताेगरे, सहायक अधिसेविकाख, जिल्हा रूग्णालय