शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

महसूल व वन विभागाची देसाईगंज येथे संयुक्त बैठक

By admin | Updated: February 28, 2016 01:35 IST

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ अन्वये सामूहिक दावे, वैयक्तिक दावे तत्काळ निकाली काढण्याबरोबरच ...

आमदारांचा पुढाकार : सहानुभूतीपूर्वक धोरण आखण्याच्या सूचनादेसाईगंज : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ अन्वये सामूहिक दावे, वैयक्तिक दावे तत्काळ निकाली काढण्याबरोबरच या दोन विभागांमध्ये ताळमेळ घडवून आणण्याच्या उद्देशाने देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभाग व वन विभागाची संयुक्त बैठक २७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीला आ. क्रिष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, सहायक उपवन संरक्षक कोडापे, वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार आदी अधिकारीवर्ग उपस्थित होते. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी नियमानुसार २००८ पूर्वी ताब्यात असलेल्या वन जमिनीचा मालकी हक्क प्रदान करण्याची तरतूद आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वैयक्तिक दावे जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले आहेत. हे दावे जिल्हास्तरीय समितीकडे प्रलंबित आहेत. मात्र वन विभागाने अतिक्रमण काढणे सुरू केले आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी आ. क्रिष्णा गजबे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार आमदारांनी वन व महसूल विभागाची संयुक्त बैठक बोलविली होती. या बैठकीदरम्यान जोपर्यंत जिल्हास्तरीय समितीचा प्रस्ताव येत नाही. तोपर्यंत वन विभागाने कोणतीही कार्यवाही करू नये, तसेच उपवनसंरक्षक यांनी वनहक्काने प्राप्त झालेल्या जमिनीला पांदन रस्ते, विद्युत पुरवठा उपलब्ध होण्यासाठी सहानुभूतीपूर्वक मान्यता द्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीला महसूल कर्मचारी, वन कर्मचारी तसेच देसाईगंज तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. वनपट्टे मिळालेल्या शेकडो नागरिकांनी रोहयो अंतर्गत पांदन रस्ते बांधून द्यावे, यासाठी रोहयो विभागाकडे अर्ज केला आहे. रोहयो विभागाने यासाठी निधीही मंजूर केला आहे. मात्र वन विभाग जागेची परवानगी देत नसल्याने अनेक पांदन रस्त्यांचे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)