जीप पलटली; आठ महिला जखमी
By Admin | Updated: November 24, 2014 22:57 IST2014-11-24T22:57:29+5:302014-11-24T22:57:29+5:30
तालुक्यातील मालमपोडूरवरून मेडपल्लीला महिला मजूर घेऊन जाणारी जीप पलटल्याने झालेल्या अपघातात जीपमधील आठ महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला लाहेरी-भामरागड मार्गावर घडली.

जीप पलटली; आठ महिला जखमी
भामरागड : तालुक्यातील मालमपोडूरवरून मेडपल्लीला महिला मजूर घेऊन जाणारी जीप पलटल्याने झालेल्या अपघातात जीपमधील आठ महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला लाहेरी-भामरागड मार्गावर घडली.
या अपघातात निब्बा राजू वड्डे (२२), वर्षा दुन्गो काळंगा (३२), माधुरी धुर्वा (२२), चुकेशनी वड्डे (२०), लक्ष्मी धूर्वा (२०), रणजिता ओक्सा (१८), मंकी विज्जा पुंगाटी (२०) जया कोप वड्डे (२०) सर्व रा. कोयर ता. भामरागड आदी आठ महिला मजूर जखमी झाल्या.
प्राप्त माहितीनुसार एम.एच. ३४ ए.एम. ०९५२ हे वाहन भामरागड तालुक्यातील मालमपोडूरच्या आठ महिला मजुरांना मेडपल्ली येथील बांबू डेपोमध्ये बंडल बांधण्याच्या कामासाठी नेत होत. दरम्यान लाहेरी भामरागड मार्गावर वाहनचालक चुक्कू तीम्मा रा. हिंदेवाडा याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन पलटले. यात आठ महिला मजूर जखमी झाल्या. सर्व जखमी महिला मजुरांना तत्काळ १०८ क्रमांकाच्या शासकीय रूग्णवाहिकेने घटनास्थळावरून भामरागडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृती अधिक गंभीर असलेल्या निब्बा वड्डे, माधुरी, धुर्वा, रणजिता ओक्सा यांना अहेरीला आणण्यात आले. त्यानंतर चंद्रपूरला हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)