मार्कंडादेव येथे उसळणार जनसागर
By Admin | Updated: August 3, 2016 02:13 IST2016-08-03T02:13:45+5:302016-08-03T02:13:45+5:30
श्रावणमासाला बुधवारपासून प्रारंभ होत असल्याने विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे भगवान शिवशंकर

मार्कंडादेव येथे उसळणार जनसागर
श्रावण मासारंभ : दर सोमवारी निघणार मार्कंडात पालखी; ट्रस्टतर्फे व्यवस्था पूर्ण
चामोर्शी : श्रावणमासाला बुधवारपासून प्रारंभ होत असल्याने विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मार्र्कंडादेव येथे भगवान शिवशंकर व शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरिता भाविकांचा जनसागर उसळणार आहे. यादृष्टीने मार्र्कंडादेव येथे विशेष तयारीही करण्यात आली आहे.
मार्र्कंडादेव येथे श्रावण महिन्यात दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. मंदिरात भगवान शंकर व शिवलिंगाची पूजाअर्चा, अभिषेक, बिल्वार्पण, महापूजा तसेच संपूर्ण श्रावणमास धार्मिक विधी पार पाडला जातो. श्रावण महिन्यात दर सोमवारी पालखी काढली जाणार आहे. याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भगवान शिवशंकर व शिवलिंगाचे दर्शन श्रावण महिन्यात पवित्र मानले जात असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून प्राप्त होणारी देणगी परिसर स्वच्छता, पूजा, प्रसाद, विजेचे साहित्य, विद्युत बिल, मंदिरातील कर्मचाऱ्यांचे मानधन यावर खर्च होणार आहे. देवस्थान परिसरात भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. दरवर्षी मार्र्कंडा येथे श्रावणमासानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असते. या मासात दररोज विशेषत: सोमवारी पहाटेपासूनच मंदिरस्थळी गर्दी असते. अनेक भाविक वैनगंगा नदीपात्रात स्नान करून भगवान शंकर यांच्यासह मार्र्कंडेश्वराचेही दर्शन घेत असतात. मंदिर स्थळी असलेल्या अनेक ऋषी मुनींची पूजाअर्चा करून श्रीफळ वाहतात व प्रसादही इतरांना वितरित करतात.
दर सोमवारी श्री मार्र्कंडेश्वरराची पालखी रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेतून ते श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान मंदिर व गावातील मुख्य मार्गाने नेऊन रामप्रसाद महाराज धर्मशाळेत पालखीचा समारोप होणार आहे, अशी माहिती श्री मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा उत्सव समिती अध्यक्ष गजानन भांडेकर, रामप्रसाद महाराज, जयस्वाल मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडूकवार, सचिव अशोक तिवारी, सहसचिव केशव आंबटवार, विश्वस्त गोपाल महाराज रणदिवे, प्रकाश कापकर, रामेश्वर काबरा, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामूजी तिवाडे, कोषाध्यक्ष पां. गो. पांडे यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
दर्शनस्थळात केला बदल
सध्या मुख्य मंदिराच्या कळसाचे बांधकाम पुरातत्त्व विभागातर्फे सुरू आहे. मुख्य मंदिरातील शिवलिंगाची पूजा करता येणार नसल्याने त्याची व्यवस्था मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या नंदकेश्वराच्या जवळ मोकळ्या जागेत तसेच पूर्व दिशेला असलेल्या नारळ फोडण्याच्या जागेवरही पूजाअर्चा करता येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.