शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

जनहितवादी युवा समितीचे अहेरीत ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 8, 2017 02:15 IST

सूरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सूरजागड बचाव संघर्ष समिती तसेच पेसा, ग्रामसभा,

सूरजागड प्रकल्प : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहेरी : सूरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सूरजागड बचाव संघर्ष समिती तसेच पेसा, ग्रामसभा, अहेरी जिल्हा कृती समिती यांच्या मार्फतीने अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन तसेच थालीनाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी केले. सूरजागड परिसरातून लोहखनिज उत्खननासाठी ग्रामसभा व तालुक्यातील जनतेला विश्वासात घ्यावे, सूरजागड लोहप्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची जागृती करावी, या परिसरातील जनतेला गौण वनोपजाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र सुरजागड लोहप्रकल्प झाल्यास हा रोजगार नष्ट होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई व व्यवस्थापन करण्यासंदर्भात तरतुदी होणे आवश्यक आहे. जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात येणार नाही. याकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे. क्रश व स्टील प्लान्ट एटापल्ली, भामरागड, आलापल्ली तसेच अहेरी परिसरात उभारण्यात यावा, लोहप्रकल्प, क्रश प्लान्ट व स्टील प्लान्टमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावे, लोहप्रकल्पातून जमा होणाऱ्या एकूण रॉयल्टीपैकी सात टक्के रॉयल्टी दुर्गम भागाच्या विकासाकरिता खर्च करावी, आदी मागण्यांसाठी थालीनाद आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)