जांभुळेंचे देवराव होळींना खुले आव्हान

By Admin | Updated: July 22, 2015 02:24 IST2015-07-22T02:24:41+5:302015-07-22T02:24:41+5:30

भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ...

Jambulanee Devrao Challenge Open Holi | जांभुळेंचे देवराव होळींना खुले आव्हान

जांभुळेंचे देवराव होळींना खुले आव्हान

अडचणी वाढणार : ब्लॅकमेलिंग प्रकरणात फौजदारी तक्रार दाखल कराच
गडचिरोली : भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत नारायण जांभुळे यांचा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न फसला असा आरोप केला. या आरोपानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण जांभुळे यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांनी या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आवाहन त्यांना दिले आहे. यामुळे आमदार देवराव होळी यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नारायण दिनबाजी जांभुळे यांनी २० जुलै रोजी आमदार डॉ. देवराव होळी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, २० सप्टेंबर २०१४ ला दुपारी ४ वाजता दरम्यान नामनिर्देशनपत्र छाननीच्या वेळी माझा प्रवेश झाला. ती आपली पहिली व शेवटची भेट होती. अगदी खाली प्रवेशद्वाराजवळ सात-आठ मंडळी खुर्च्यांवर बसलेले होते. त्या व्यक्तींमधील खासदार अशोक नेते सोडल्यास मी कोणालाही ओळखत नव्हतो. खासदार नेते माझ्या धाकट्या भावाचे मित्र असल्याने मागील २५ वर्षांपासून तोंडओळख आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बाजुची खूर्ची दुसऱ्याला उठवून मला बसायला दिली. बाजुच्या खुर्चीवर बसलेले अ‍ॅड. खानझोडे, बुर्लावार अशी त्यांची ओळख करून दिली आणि ज्याची खुर्ची खाली करून मला उपलब्ध करून दिली, त्यांचा परिचय करून देताना हे आमच्या पक्षाचे उमेदवार डॉ. देवराव होळी हीच हस्तांदोलन करण्याची पहिली व शेवटची भेट. त्यावेळी आपण डॉक्टर व अती शिकलेले असल्याने मी आपल्याशी काही वाक्य इंग्रजीत बोललो. परंतु आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता आम्ही बसलेल्या ठिकाणापासून दूर जाऊन उभे राहिलात. त्यावेळी खासदार नेते यांनी मला आपल्या राजीनाम्याविषयी माहिती दिली व त्यांनी सांगितले की, राजीनामा नियमाप्रमाणे दिला. परंतु एक महिन्याच्या आत राजीनामा मंजूर झालेला नाही. त्यामुळे काय होईल, अशी विचारणा केली होती. त्यावर मी तुमचा नामनिर्देश अर्ज रद्द होत नाही, असे बोलल्याचे आठवते. त्यानंतर आजतागायत आपल्याशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधला नाही, कधी चर्चा केली नाही. त्यामुळे आपल्याकडून आपणाशी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. याचे काही पुरावे असेल तर आपण या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे खुले आव्हान जांभुळे यांनी आमदार डॉ. होळी यांना दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Jambulanee Devrao Challenge Open Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.