प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:38+5:302021-09-21T04:40:38+5:30

मूळचे उत्तर प्रदेशातील, पण अहेरी येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे फरमान मलिक यांच्याकडे मृत सलमान हा डिझाइन कार्पेन्टर म्हणून काम ...

Jalasamadhi to the youth in Pranhita river | प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी

प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी

मूळचे उत्तर प्रदेशातील, पण अहेरी येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे फरमान मलिक यांच्याकडे मृत सलमान हा डिझाइन कार्पेन्टर म्हणून काम करायचा. तो मालक फरमान मलिक यांचा साला आहे. शनिवारी सुट्टी होती. त्यामुळे सलमानसह त्याच्यासोबत काम करणारे शदाब शरोब चौधरी (१८) आणि आसिम शेफिक (१८) रा.गाझियाबाद (उ.प्र.) हे तिन्ही युवक प्राणहीता नदीघाटावर फिरायला गेले होते. रिमझिम पावसामुळे ते युवक पुलाच्या खाली उतरले. या दरम्यान, मालक फरमान यांनी फोन करून, त्यांना अहेरीकडे येण्यास सांगितले. ‘हो निघालोच,’ असे म्हणत पाय धुण्यासाठी ते नदीच्या किनाऱ्यावर गेले. याच वेळी सलमान याचा तोल गेल्याने तो नदीत पडला.

(बॉक्स)

वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ

सलमानला वाचविण्यासाठी आधी शदाब व शदाबला वाचविण्यासाठी आसिम पाण्यात गेले. शदाब व आसिम कसेबसे पाण्याच्य बाहेर निघाले, पण सलमान मलिक पाण्यात वाहून गेला. मालक फरमान यांचे फिरायला गेलेल्या युवकांशी काही मिनिटाअगोदर बोलणे झाले, पण नंतर कुठलाच संपर्क होत नसल्याने भयभीत होऊन त्यांनी नदीकडे धाव घेतली असता, त्यांना ही दुर्घटना कळली. मात्र, घटनास्थळ तेलंगणा राज्याच्या सीमेवर असल्याने, फरमान यांनी तेलंगणातील मानेपल्ली पोलीस स्टेशनकडे धाव घेतली, पण त्यांना योग्य ती मदत मिळू शकली नाही.

(बॉक्स)

प्रशासनाचा पुढाकार

दरम्यान, सदर दुर्घटनेची माहिती आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व हिमायत शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितली. त्यांनी अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्याम गव्हाणे व तहसीलदार ओंकार ओतारी यांना कळविले. त्यांनी ही दुर्घटना कोणाच्या सीमेत घडली, याचा विचार न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण अंधार पडल्यामुळे व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाण्यात नावेने शोध घेणे शक्य नव्हते. रविवारी सकाळी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह सापडला.

Web Title: Jalasamadhi to the youth in Pranhita river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.