कारागृह अधीक्षकांचा सत्कार

By Admin | Updated: July 6, 2016 01:43 IST2016-07-06T01:43:55+5:302016-07-06T01:43:55+5:30

येथील खुल्या कारागृहाचे अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांची अमरावती येथे बदली झाली आहे. या निमित्त नगर परिषद तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने

Jail Superintendents Felicity | कारागृह अधीक्षकांचा सत्कार

कारागृह अधीक्षकांचा सत्कार

ढोले यांच्या कार्याची केली प्रशंसा : नगर परिषद व शिवसेना महिला आघाडीतर्फे
गडचिरोली : येथील खुल्या कारागृहाचे अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांची अमरावती येथे बदली झाली आहे. या निमित्त नगर परिषद तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा डॉ. अश्विनी धात्रक यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. ढोले यांचा सत्कार केला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. यावेळी नगरसेवक अजय भांडेकर, संजय मेश्राम, रामकिरीत यादव आदी उपस्थित होते. डॉ. ढोले यांच्या प्रयत्नाने अल्पावधीतच कारागृहाचा कायापालट होण्यास मदत झाली. अनेक संस्थांच्या वतीने मदत मिळवून सदर मदत बंदीजन व त्यांच्या कुटुंबियांना मिळवून दिली. हे अत्यंत प्रशंसनीय कार्य असल्याचे प्रतिपादन डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीनेही डॉ. ढोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या छायाताई कुंभारे, सुनंदा आतला, सुषमा राऊत, कलिंदा कडवे, शकून नंदनवार व कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनीही डॉ. भाईदास ढोले यांचा सत्कार केला. डॉ. ढोले यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी प्रवीण मुक्तावरम व गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Jail Superintendents Felicity