शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्याची हत्या करून लपला जंगलात; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 10:36 IST

दोन अद्याप फरार : पोलिस भरतीचा प्रयत्न केला म्हणून निष्पाप साईनाथला गोळ्या झाडून संपविले

गडचिरोली :पोलिस भरती व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास होळीसाठी गावी आल्यावर गोळ्या झाडून संपविल्याची घटना ९ मार्चच्या रात्री घडली होती. दरम्यान, हत्या केल्यानंतर मुख्य आरोपी जंगलात दडून बसला होता, त्यास नक्षलविरोधी अभियानच्या जवानांनी सापळा रचून १४ मार्चच्या रात्री अटक केली. त्याचे दोन साथीदार फरार आहेत.

प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे (वय २७, रा. मर्दहूर, ता. भामरागड ) असे आरोपीचे नाव आहे. साईनाथ चैतू नरोटी (२६,रा. मर्दहूर, ता. भामरागड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गडचिरोली येथे पदवीचे शिक्षण घेत होता. शिवाय पोलिस भरतीसाठी त्याने प्रयत्न केले होते, याशिवाय स्पर्धा परीक्षेचीही तो तयारी करीत होता. त्यामुळे तो नक्षल्यांच्या निशाण्यावर होता. होळीनिमित्त सुटीवर तो गावी गेला होता. ९ रोजी तो आई-वडिलांसह शेतात असताना त्यास नक्षल्यांच्या वेशभूषेतील तिघांनी बाजूला नेले, त्यानंतर गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने खळबळ उडाली होती.

बोलण्यासाठी नेले अन् गोळ्या झाडून मारले, अडीच तासांनंतर मिळाला मृतदेह

पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या भामरागड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर होती. दरम्यान, हत्येमागे प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे हा असल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानला होती. त्यानुसार, त्यास १४ रोजी मर्दहूरपासून दहा किलोमीटरवरील जंगलात मोठ्या शिताफीने शोधमोहीम राबवून बेड्या ठोकल्या. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान)अनुज तारे, अपर अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, अपर अधीक्षक अहेरी यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

क्रूरकर्मा प्रकाशवर खुनाचे दहा गुन्हे

प्रकाश ऊर्फ आडवे गावडे हा कुख्यात नक्षलवादी असून, तो सन २००० पासून या चळवळीशी जोडला गेलेला आहे. पेरमिली दलमध्ये तो सदस्य म्हणून भरती झाली होती. गोंदियातील उत्तरगडमध्ये डेप्युटी कमांडर, प्लाटून कमांडर म्हणूनही त्याने काम केले. त्याच्यावर तब्बल २२ गुन्हे आहेत. त्यापैकी दहा गुन्हे खुनाचे आहेत. आठ चकमक, एक दरोडा, दोन जाळपोळ व इतर एक अशी त्याची क्राईम हिस्ट्री आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीArrestअटकPoliceपोलिस