जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर; लोकप्रतिनिधींनी घेतला पुढाकार

By Admin | Updated: October 3, 2015 01:19 IST2015-10-03T01:19:08+5:302015-10-03T01:19:08+5:30

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

Jagar of cleanliness across the district; Initiatives taken by the Representatives | जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर; लोकप्रतिनिधींनी घेतला पुढाकार

जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर; लोकप्रतिनिधींनी घेतला पुढाकार

खासदारांनी लावला झाडू : स्वच्छता मोहीम घराघरापर्यंत पोहोचविण्याचे केले आवाहन
गडचिरोली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सदर उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातही राबविण्यात आला. अनेक लोकप्रतिनिधींनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी झाडू लावून अभियानाची सुरुवात केली.
इंदिरा गांधी चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास स्वच्छता अभियान राबविण्यात आला. या अभियानात खा. अशोक नेते, बाबुराव कोहळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, रेखा डोळस, बी. एम. राजनहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता अभियानानंतर मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते यांनी स्वच्छतेचे महत्त्व ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून १२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून अधिकाधिक शौचालयांचे बांधकाम होतील, यासाठी प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन केले.
वन परिक्षेत्र कार्यालय कुरखेडाच्या वतीने कुरखेडा-कोरची मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कुरखेडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एम. गाजलवार, वनपाल एस. जे. ताजणे, गेवर्धा उपक्षेत्राचे वनपाल एल. एम. ठाकरे, गोठणगाव उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक पी. एम. मेनेवार, पलसगड उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक पी. के. भडांगे, डेपो आॅफिसर मल्लेलवार, वनरक्षक एम. एच. राऊत, व्ही. जी. बोरकुटे, पंधरे, ए. पी. धात्रक, गाजी शेख, समर्थ यांच्यासह वन कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी तालुका शाखा कुरखेडाच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, संघटक जलालभाई सय्यद, बबलू हुसैनी, रामहरी उगले, अ‍ॅड. उमेश वालदे यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले होते.
पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, युवा भारत, महिला पतंजली योग, किसान पंचायत, भारत स्वच्छता अभियान तालुका शाखा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात समितीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व नागरिक उपस्थित होते. समितीच्या वतीने एसटी सफाई कामगार संदीप शेरकी यांचा गौरव करण्यात आला. स्वच्छता अभियानात प्रामुख्याने भारत स्वच्छता अभियानाचे जिल्हा प्रभारी सत्यमकुमार, तालुका प्रभारी राहुल पवार, जिल्हा युवा सहप्रभारी प्रवीण कोटेचा, अजय कोटेचा, प्रा. अमोल नेरलवार, योगेंद्र मेश्राम, डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार, युवती प्रभारी दामिनी गडे आदी उपस्थित होते. पतंजली योग समितीच्या सदस्यांनी वाहक व चालकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. (लोकमत वृत्तसेवा)

Web Title: Jagar of cleanliness across the district; Initiatives taken by the Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.