शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

रक्ताच्या नात्याला जात वैधतेचा पुरावा मानणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:12 AM

वडील, सखे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्त्वाचा पुरावा मानून अर्जदारास जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र देणे .....

ठळक मुद्देखऱ्या आदिवासींवर अन्याय : संघटनांचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडील, सखे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्त्वाचा पुरावा मानून अर्जदारास जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र देणे हे अन्यायकारक असल्याचा आरोप ट्रायबल आॅफिसर्स फोरम, आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन व इतर आदिवासी संघटनांनी केला आहे.राज्य शासनाने ३ आॅक्टोबर २०१७ च्या मंत्रीमंडळ बैठकीत वडील, सखे चुलते यापैकी एकाकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्यास अर्जदारास सुध्दा जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय अन्यायकारक असून खऱ्या आदिवासींना संपविण्याचे षडयंत्र शासनाने सुरू केले आहे. रक्ताच्या नात्यातील नागरिकाने भ्रष्टाचाराचे मार्गाने जात वैधता प्रमाणपत्र मिळविले असल्यास त्याच्या पाल्यालाही जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र डोळे झाकून देणे अन्यायकारक ठरले आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या विभागाने घेतलेला निर्णय आता आदिवासी विकास विभागालाही लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संविधानात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा दर्जा ठरविण्याचे निकष अतिशय भिन्न आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी लागू केलेला नियम अनुसूचित जमातींवर लादने अन्यायकारक होईल. सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आदिवासींच्या मनात चिड निर्माण झाली आहे. असा दावा केला आहे. सदर नियम आदिवासींसाठी लागू केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला ट्रायबल आॅफीसर्स फोरमचे अध्यक्ष एम. एम. आत्राम, एन. झेड. कुमरे, डॉ. अनिल कुमरे, माधव पेंदोर, हरीराम मडावी, सदानंद कुमरे, गोवारी समाज संघटनेचे गुलाब मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष संदीप वरखडे, विलास कोडाप, वामन जुनघरे, रामचंद्र काटेंगे आदी उपस्थित होते.