काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लस घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:43+5:302021-06-28T04:24:43+5:30
जिल्हा न्यायालयात कार्यरत कर्मचारी आणि अधिवक्ता यांच्यासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिर २५ जून राेजी आयाेजित करण्यात आले. या शिबिरात ...

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी लस घेणे आवश्यक
जिल्हा न्यायालयात कार्यरत कर्मचारी आणि अधिवक्ता यांच्यासाठी काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिर २५ जून राेजी आयाेजित करण्यात आले. या शिबिरात ते बाेलत हाेते. जिल्हा न्यायालय, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात हे शिबिर घेण्यात आले. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले उपस्थित होते. यावेळी जिल्हा न्यायालयातील ७६ कर्मचारी व अधिवक्त्यांनी लस घेतली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. देशमुख, सहायक अधीक्षक भागवतकर, वरिष्ठ लिपिक पुणेकर, बागडे, सोरते, पी. के. मडावी, ए. डी. गुरनुले, शंकर आळे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
270621\27gad_4_27062021_30.jpg
===Caption===
काेराेना प्रतिबंधक लस घेताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी.खटी.