ईशांक बानबले जिल्ह्यात पहिला
By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:38+5:302016-06-07T07:39:38+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.९७ टक्के लागला आहे. ४१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

ईशांक बानबले जिल्ह्यात पहिला
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.९७ टक्के लागला आहे. ४१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूलचा ईशांक यादवराव बानबले हा विद्यार्थी ९६.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. जिल्ह्यातून १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २ हजार १९८ विद्यार्थी नापास झाले आहेत. जिल्ह्यातून ८६.२७ टक्के मुले व ८९.७९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात कोरची या अतिदुर्गम तालुक्याचा सर्वाधिक ९२.४१ टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल धानोरा तालुक्याचा ८५.६३ टक्के लागला आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरीची खुशबू साठवणे हिने मिळविला. तिला ९५.८० टक्के गुण आहे. तर राजे धर्मराव हायस्कूल आष्टीची काजल दुर्गे ही जिल्ह्यातून तिसरी आली आहे. तिला ९५.६० टक्के गुण मिळाले आहे. गडचिरोली येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा किशन परतानी हा ९५.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून चौथा आला आहे. तर नागेपल्लीच्या सेंट फ्रांसीस इंग्लिश मीडिअम शाळेची श्रावणी उत्तरवार ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पाचवी आली आहे. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला १७ हजार १२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार ५५४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ५ हजार ८४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार २३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार २९७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून ३२५ शाळांमधून १७ हजार १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४ हजार ९२७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये ७ हजार ३९१ मुले व ७ हजार १६९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार ५५४ प्राविण्य श्रेणीत, ५ हजार ८४६ प्रथम श्रेणीत, ६ हजार २३० द्वितीय श्रेणीत, १ हजार २९७ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १० आश्रमशाळांचा निकालही १०० टक्के लागला आहे. यावर्षी ग्रामीण भागातूनही अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्याच्या वर गुण मिळाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
३६७ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण
४जिल्हाभरातून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सर्वच विद्यालयांमधून एकूण ५७९ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी नामांकन दाखल केले. यापैकी ५७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २२७ मुले व १४० मुलींचा समावेश आहे. यांच्या निकालाची टक्केवारी ६३.९४ टक्के आहे. याशिवाय ९३ विद्यार्थ्यांनी खासगीरित्या परीक्षा दिली. यापैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ४९.४६ आहे. आयसोलेटेड ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.
तालुकानिहाय निकाल
गडचिरोली ८६.३१
अहेरी ९२.०५
आरमोरी ८७.१३
भामरागड ८७.६३
चामोर्शी ८६.२४
देसाईगंज ८६.२७
धानोरा ८५.६३
एटापल्ली ८८.३५
कोरची ९२.४१
कुरखेडा ८९.३८
मुलचेरा ९०.६६
सिरोंचा ८९.१४
एकूण ८७.९७