तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST2021-09-26T04:40:27+5:302021-09-26T04:40:27+5:30
ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी देसाईगंज : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघात सुद्धा वाढले. ...

तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघात सुद्धा वाढले. सदर ओव्हरलोड वाहतुकीकडे ठाणेदार व परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील प्रमुख मार्ग खराब असूनही येथून ओव्हरलोड वाहतूक सतत हाेत आहे.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने रस्त्यात वाहन उभे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुरखेडातील अंतर्गत नाल्या तुंबल्या
कुरखेडा : प्रशासनाच्या वतीने अनेक दिवसांपासून शहरातील नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे.
नगरपंचायत प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष हाेत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता देखील नाही.
मामिडीताेगू जवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. हा प्रश्न अनेक वर्षांपासून सुरू आहे.
दुर्गम भागात माेबाईल सेवा कुचकामी
आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवा प्रमाणे दिला जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
रस्त्यांवर बांधकाम साहित्य ; कारवाई करा
धानोरा : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी गज तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. नगर पंचायतीच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.