लोहपोलाद कारखाना एटापल्ली तालुक्यातच उभारा
By Admin | Updated: December 9, 2015 02:00 IST2015-12-09T02:00:06+5:302015-12-09T02:00:06+5:30
अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही एकही उद्योग स्थापन झाला नाही.

लोहपोलाद कारखाना एटापल्ली तालुक्यातच उभारा
निवेदन : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीची मागणी
अहेरी : अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही एकही उद्योग स्थापन झाला नाही. त्यामुळे या भागात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रशासनाने एटापल्लीत लोहपोलाद कारखाना उभारावा, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले आहे. आजपर्यंत या भागातील खनिज व वन संपत्ती इतरत्र हलविण्यात आली आहे. त्यामुळे येथील तरूणांना रोजगाराअभावी रिकामे बसावे लागते. हा या भागातील बेरोजगार युवकांवरील मोठा अन्याय आहे. या भागातील बांबू व सागवन वनसंपत्ती जिल्हाबाहेर नेल्या जात आहे. त्यामुळे बांबूवर आधारित कागद कारखाना आलापल्ली येथे स्थापन करण्यात यावा, एटापल्ली तालुक्यात लोहपोलाद कारखाना तर देवलमरी येथे सिमेंट उद्योग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांनी स्वीकारले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, प्रेमकुमार झाडे, आत्माराम दुर्गेे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)