सुरजागडातून लोहखनिजाची वाहतूक पुन्हा सुरू
By Admin | Updated: February 7, 2017 00:45 IST2017-02-07T00:45:20+5:302017-02-07T00:45:20+5:30
एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर लायड्स मेटल कंपनीकडून पुन्हा लोहखनिज उत्खननाच्या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

सुरजागडातून लोहखनिजाची वाहतूक पुन्हा सुरू
जळीतकांडानंतर सुरूवात : स्थानिक गावातील मजुरांना कामावर बोलाविले
एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडीवर लायड्स मेटल कंपनीकडून पुन्हा लोहखनिज उत्खननाच्या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी ११ ट्रक लोहखनिजाची वाहतूक करण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. २३ डिसेंबर २०१६ रोजी माओवाद्यांनी लोहखनिज वाहतुकीच्या कामावर असलेल्या ७९ वाहनांना जाळले होते. त्यानंतर जवळजवळ एक महिना हे काम बंद होते. त्यानंतर जळालेले वाहन उचलून नेण्याचे काम करण्यात आले व आता पुन्हा येथे उत्खनन करून लोहखनिजाची वाहतूक घुग्गुसकडे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे एटापल्ली ते सुरजागड या मार्गावर पुन्हा ट्रकची वाहतूक सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुला ट्रक उभे असल्याचे दिसून आले. स्थानिक मजुरांना येथे कामावर बोलाविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)