रक्तदानात पोलिसांसह महिलांचाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:46 IST2021-07-07T04:46:09+5:302021-07-07T04:46:09+5:30
या शिबिराचे उद्घाटन चामोर्शीचे ठाणेदार पो.निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयचे प्रा.डॉ.राजेंद्र झाडे ...

रक्तदानात पोलिसांसह महिलांचाही सहभाग
या शिबिराचे उद्घाटन चामोर्शीचे ठाणेदार पो.निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयचे प्रा.डॉ.राजेंद्र झाडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शेखर दोरखंडे, होप फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी, जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार उपस्थित होते. यावेळी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रक्तदानासाठी अनेक महिलाही सरसावल्या. काहींना वैद्यकीय पात्रतेत बसत नसल्याने, रक्तदानापासून वंचित राहावे लागले.
अध्यक्षीय भाषणातून प्रा.झाडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना काळामध्ये रक्ताचा तुडवडा असताना, लोकमत वृत्तसमूहाने सामाजिक बांधिलकी समजून हा कार्यक्रम चामोर्शी येथे घेऊन आपले औदार्य दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले. अतुल गण्यारपवार यांनी शिबिराला शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे उपस्थित होते.
प्रास्ताविकात होप फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी यांनी समाजात रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे घेण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ‘लोकमत सखीमंच’च्या सदस्या प्रा.डॉ.वंदना चौथाले यांनी, तर आभार प्रदर्शन भेंडाळाचे लोकमत प्रतिनिधी रोशन थोरात यांनी केले.
या शिबिरासाठी लोकमत प्रतिनिधी लोमेश बुरांडे, घोटचे पांडुरंग कांबळे, तसेच सखीमंचच्या तालुका संयोजिका सोनाली पालारपवार, सदस्य चेताली चांदेकर, वंदना चौथाले, वर्षा भांडरवार, रजनी मस्के, अमृता आइंचवार, स्नेहल खाडे, नयना सिडाम, अनिता बोकडे, माधुरी बर्लावार यांच्यासह चेतन गेडाम, करण शेटे, धनराज बारसागडे या युवकांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
पोलीस निरीक्षकांचे रक्तदान
या शिबिरासाठी चामोर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. विशेष म्हणजे, स्वत: पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनीही रक्तदान करून आपल्या सहकाऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केले. पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून जवळपास १५ जणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला.