लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव उपवन क्षेत्रातील सावलखेडा कक्ष क्रमांक ३१ मधील सागवनाच्या रोपवनातील सागाची अवैैध तोड होत असल्याने रोपवन विरळ झाले आहे. परंतु या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रोपवनातील वन परिक्षेत्राबाहेरील लोक अवैध वृक्षतोड करून सागवानाची तस्करी करीत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केली आहे.सावलखेडा बिटातील सागवनाची रोपवन म्हणजे आरमोरी वन परिक्षेत्रातील सगळ्यात मोठे रोपवन आहे. वडसा वन विभागात सुरूवातीचे सावलखेडाचे रोपवन असून येथे ३० ते ४० वर्षांपूर्वीची झाडे आहेत. परंतु या मोल्यवान सागवानाची मोठ्या प्रमाणावर तोड करून तस्करी केली जात आहे. परंतु पळसगाव उपवन क्षेत्राचे क्षेत्र सहायक आणि सावलखेडा बिटाचे वनरक्षक ही अवैध वृक्षतोड थांबविण्यास कोणतीही कारवाई करीत नाही, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.सावलखेडाच्या सागवन रोपवनात क्षेत्र सहायक, वनरक्षक, वन मजूर व आमची रात्रंदिवस गस्त असून वृक्षतोड करताना आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाते. आणि हे रोपवन वाचविण्याची जबाबदारी वन विभागासोबतच स्थानिक नागरिकांची आहे.- डी. यू. गीते, वनरक्षक, सावलखेडा
सावलखेडात अवैध वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:46 IST
आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव उपवन क्षेत्रातील सावलखेडा कक्ष क्रमांक ३१ मधील सागवनाच्या रोपवनातील सागाची अवैैध तोड होत असल्याने रोपवन विरळ झाले आहे.
सावलखेडात अवैध वृक्षतोड
ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : तस्करी होत असल्याचा आरोप