अवैध व्यवसाय झाले परवानाप्राप्त
By Admin | Updated: October 29, 2014 22:49 IST2014-10-29T22:49:31+5:302014-10-29T22:49:31+5:30
तालुक्यात दारू, सट्टा, अवैद्य प्रवासी वाहतूक, भुरट्या चोरी, वेश्या व्यवसायाचे प्रमाण फार वाढले आहे़ मागाल तिथे दारू, टेलिफोनिक सट्टा व अवैध प्रवासी वाहतुकीला तर सुर्वणदिन आले आहेत़

अवैध व्यवसाय झाले परवानाप्राप्त
शॉर्टकट मार्ग : तालुक्यातील अवैध धंदे रोखण्यात पोलीस अपयशी
देसाईगंज : तालुक्यात दारू, सट्टा, अवैद्य प्रवासी वाहतूक, भुरट्या चोरी, वेश्या व्यवसायाचे प्रमाण फार वाढले आहे़ मागाल तिथे दारू, टेलिफोनिक सट्टा व अवैध प्रवासी वाहतुकीला तर सुर्वणदिन आले आहेत़ पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत सर्व व्यवसाय सुरू असूनही हा अवैध व्यवसाय थांबविण्यात अपयश मिळत आहे़ भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले असतांनादेखील पोलिसांच्या अपयशामुळे घरी चोरी होऊनही कित्येक नागरिक साधी तक्रारही पोलीस प्रशासनाकडे देत नाहीत़ शहरात अवैद्य धंद्यांनी कळस गाठला असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे
देसाइगंज शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैद्य धंद्यानी तोंड वर केले आहे़ दिवाळीसारखा सण व धान कापणीमुळे मजूर वर्गाच्या हातात पैसा खेळत आहे़ त्यामुळे दारू, सट्टा या अवैद्य धंद्याला उत आला आले़ मागाल तिथे दारू अशी अवस्था दारूच्या व्यवसायाची झाली आहे. सट्टा दलालांनी टेलिफोनीक सट्टा लावण्याची मुभा ठेवली आहे़ सणाचा हंगाम असल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला सुवर्णदिन आले आहेत़ पोलीस प्रशासनाला या प्रकाराची माहिती असूनही ‘‘तेरी भी चुप मेरी भी चुप’’ या उक्तीप्रमाणे कोणावरही कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे़ दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात तर दारूचा महापूर आहे़ कित्येक नागरिक हे चित्र पाहून, यापेक्षा जिल्ह्यात दारू रितसर परवानगीने सुरु करावी, असे नाईलाजाने म्हणत आहेत़ दिवसभर आकड्यांचा अंदाज बांधून सायंकाळी सट्टापट्टीवर सव्वा रूपयात शंभर रूपये कमावीने सुरू आहे़ या सट्ट्यावर कित्येकांच्या उदर निर्वाहाचा प्रश्नच सुटलेला आहे़ शहरात तर टोलेजंग इमारतीतून सट्ट्याचा व्यावसाय फुलत आहे़ पोलीस प्रशासन दिवाळीचा फराळ करण्यास या इमारतीत दाखल होते तेव्हा मात्र आश्चर्य व्यक्त करावे लागते़ शहरातील काही उच्चभ्रु इसमांच्या दुकानात, घरी अलिखीत परवाने प्राप्त जुगाराचे अड्डे सुरू आहेत़ उच्चभु्र असल्यामुळे पोलीस प्रशासनाशी अगदी जवळचे सबंध या व्यवसायिकांचे आहेत़ त्यामुळे या जुगाराच्या खेळाला मोकळेरान मिळाले आहे़ शहरातील काही झोपडपट्टी इलाख्यात वेश्या व्यवसाय जोर पकडत आहे़ शहरातील सर्व अवैध व्यवसायांचा पोलीस प्रशासनाला चांगला अभ्यास आहे़ दारूबंदी, सट्टा व्यवसायाला आळा बसविण्याची गरज आहे. शहरात काही भागात अवैध दारुविक्री व्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी या अवैध धंद्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.