अहेरी क्षेत्रात पाच नगर पंचायतीसाठी निरीक्षकांनी घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती
By Admin | Updated: October 8, 2015 01:07 IST2015-10-08T01:05:54+5:302015-10-08T01:07:56+5:30
जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले डॉ. नितीन राऊत यांनी आलापल्ली येथे अहेरी उपविभागातील

अहेरी क्षेत्रात पाच नगर पंचायतीसाठी निरीक्षकांनी घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती
आलापल्ली : जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले डॉ. नितीन राऊत यांनी आलापल्ली येथे अहेरी उपविभागातील पाच नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस पक्ष निरीक्षक तथा माजी राज्यमंत्री नितीन राऊत, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, रवींद्र दरेकर, प्रकाश ईटनकर, समशेर खॉ पठाण, पंकज गुड्डेवार, प्रशांत आर्इंचवार, डॉ. सुरेश कुमरे, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे, संतोष आत्राम उपस्थित होते.
दरम्यान नगर पंचायतीसाठी पक्षाच्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा येथील उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी माजी आ. दीपक आत्राम यांच्यासह सर्व नेत्यांनी बुद्ध विहाराला भेट दिली. (वार्ताहर)
दीपक आत्रामांची घेतली भेट
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माजी आ. दीपक आत्राम यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, दीपक आत्राम हे आमचे जुने मित्र आहे. त्यामुळे सर्व काँग्रेस नेत्यांना घेऊन आपण त्यांच्या घरी गेलो. एकूणच आजच्या या भेटीनंतर दीपक आत्राम यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मार्ग सुकर असल्याचे स्पष्ट आहे.