१८ आयएएस प्रशिक्षणार्थ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:38+5:30

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याच्या माध्यमातून अधिकाºयांचे स्वागत केले. गावकºयांशी संवाद साधून संस्कृती, शेती, शेती व्यवसाय, उत्पादन, हवामान, आरोग्य विषयी जाणून घेतले. आदिवासी प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल हे प्रशिक्षार्थी अधिकाºयांसोबत कोयनगुडा येथे गेले होते. तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कोयनगुडा येथील नागरिकांनी श्रमदानातून जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण केले.

Interview with 18 IAS trainees | १८ आयएएस प्रशिक्षणार्थ्यांची भेट

१८ आयएएस प्रशिक्षणार्थ्यांची भेट

googlenewsNext
ठळक मुद्देभामरागड तालुक्याला भेट : आदिवासी संस्कृती, प्रथा, परंपरांची जाणली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : १८ आयएसएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी भामरागड तालुक्याला भेट देऊन या तालुक्यातील आदिवासी संस्कृती, समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्यासोबत चर्चा केली. आदिवासी संस्कृती व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या अधिकाºयांनी कोयनगुडा या आदिवासी गावाला भेट दिली. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याच्या माध्यमातून अधिकाºयांचे स्वागत केले. गावकºयांशी संवाद साधून संस्कृती, शेती, शेती व्यवसाय, उत्पादन, हवामान, आरोग्य विषयी जाणून घेतले. आदिवासी प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल हे प्रशिक्षार्थी अधिकाºयांसोबत कोयनगुडा येथे गेले होते. तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कोयनगुडा येथील नागरिकांनी श्रमदानातून जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण केले. महिनाभर श्रमदान करून शाळेची डागडुजी करण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांनी विविध स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल, तहसीलदार कैलास अंडील, एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने, बीडीओ स्वप्नील मगदूम हजर होते.

देवराई आर्ट व्हिलेज प्रशिक्षण केंद्राला भेट
आदिवासी संस्कृतीवर आधारित बांबू, लाकूड व इतर धातू यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या भामरागड येथील आकर्षिक वास्तू देवरायी आर्ट व्हिलेज प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासींच्या संस्कृतीशी संबंधित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तूंची पाहणी केल्यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकाºयांनी प्रशंसा केली.
भामरागड हा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम, घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश गावांमधील आदिवासी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच आपले दैनंदिन व्यवहार पार पाडतात. येथील गरीबी व आदिवासी संस्कृती प्रशिक्षणार्थी अधिकाºयांसाठी संशोधनाचा विषय ठरू शकते.

Web Title: Interview with 18 IAS trainees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.