मध्यस्थी प्रक्रियेमुळे पैसा, वेळ व श्रमाची बचत शक्य
By Admin | Updated: June 19, 2016 01:11 IST2016-06-19T01:11:49+5:302016-06-19T01:11:49+5:30
मध्यस्थी प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा ...

मध्यस्थी प्रक्रियेमुळे पैसा, वेळ व श्रमाची बचत शक्य
जनजागृती कार्यक्रम : जिल्हा न्यायाधीशांचे प्रतिपादन
गडचिरोली : मध्यस्थी प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध्यस्थी प्रक्रियेमुळे न्यायालयाचा तसेच पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होईल, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सूर्यकांत शिंदे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात मध्यस्थी प्रक्रियेवर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बोरावार, न्यायाधिश एस. टी. सूर, मुख्य न्यायदंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, सह दिवानी न्यायाधिश, सू. म. बोमिडवार, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान, सरकारी अभियोक्ता अॅड. सचिन कुंभारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी न्यायाधिश पदवाड यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके तर आभार न. दे. लोंढे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)