शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

लवकरच सुरू होणार आंतरजिल्हा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्याला ५.५ कोटी तर जिल्हा नियोजन समितीमधील २५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : जनजीवन सुरळीत करण्यासाठी खबरदारी घेऊन उपाययोजना राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १ जुलैपासून प्रतिबंधित क्षेत्र आणि रेड झोनवगळता इतर भागातील आंतरजिल्हा वाहतूक (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) विनापास सुरू होऊ शकते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ते याबाबतचा निर्णय घेऊन जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्याला ५.५ कोटी तर जिल्हा नियोजन समितीमधील २५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, हरीराम वरखडे, जि.प.सदस्य राम मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने जनजीवन सुरळीत करण्यासाठी विशेष खबरदारी घेवून उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. लोकांमधील कोरोनाची भिती दूर झाली असली तरी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना उद्देशून केले. प्रशासन सर्व कामांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देत आहे. आदिवासी भागात तीनही प्रकल्प अधिकाºयांना दोन-दोन हजार घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून येणारा निधी खर्च करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली व अहेरीसाठी अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांचे प्रस्तावगडचिरोली आणि अहेरी येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी डीजिटल अत्याधुनिक अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थी व सर्वसाधारण विद्यार्थ्यांना अनुक्रमे ७० व ३० टक्के याप्रमाणे त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच ५० एकर जागेत रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून लष्करी प्रशिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेची शिकवण तिथे मिळेल. त्याबाबत प्रस्ताव पाठविला जात आहे. आदिवासी विकास विभागाकडून त्यासाठी निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातून चांगले अधिकारी निर्माण होण्यासाठी व शिक्षणाची गोडी स्थानिक युवकांना लागण्यासाठी याचे नियोजन केला जात आहे.मेडिकल कॉलेज व प्रयोगशाळेची प्रक्रि या अंतिम टप्प्यातजिल्ह्यात मंजुरी मिळालेले मेडिकल कॉलेज पुढील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. २.१८ कोटींची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. या लॅबमुळे कोरोना चाचण्यांसह इतर आजारांवरील चाचण्याही जिल्ह्यातच होणार आहेत. 

टॅग्स :Socialसामाजिक