आष्टी येथे स्वतंत्र विद्युत फिडर बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST2021-04-22T04:38:05+5:302021-04-22T04:38:05+5:30
आष्टीची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. येथील विद्युत फिडरवरून मार्कंडा कं., रामकृष्णपूर, कढोली, चौडमपल्ली आदी जंगलाने वेढलेल्या गावांना ...

आष्टी येथे स्वतंत्र विद्युत फिडर बसवा
आष्टीची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. येथील विद्युत फिडरवरून मार्कंडा कं., रामकृष्णपूर, कढोली, चौडमपल्ली आदी जंगलाने वेढलेल्या गावांना विद्युत पुरवठा होताे. वादळ, पाऊस व अवैध शिकार यामुळे वारंवार आष्टी परिसरातील विद्युत पुरवठा बंद होत असल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची मागणी सतत वाढत असल्यामुळे आष्टी येथील विद्युत फिडरवर सतत दाब वाढत आहे. विद्युत पुरवठ्यामध्ये ट्रिप होणे, तारा तुटणे अशा समस्या वारंवार निर्माण होत आहे. त्याचबरोबर आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यामुळे भविष्यात स्वतंत्र विद्युत फिडर बनवण्याकरिता जागेची समस्या निर्माण होऊ शकते. येथील विजेची समस्या साेडविण्यासाठी स्वतंत्र फिडरची निर्मिती करावी, अशी मागणी ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरतर्फे प्रा. डाॅ. भारत पांडे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
===Photopath===
210421\21gad_5_21042021_30.jpg
===Caption===
अभियंता देशपांडे यांना निवेदन देताना डाॅ. भारत पांडे.