सहायक जिल्हाधिकाºयांनी केली गोदावरी पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:07 IST2017-10-16T00:07:39+5:302017-10-16T00:07:49+5:30

गोदावरी नदीपुलावर रेती भरलेल्या अवजड ट्रकांची रांग राहत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे.

Inspector of Godavari Godavari Bridge survey | सहायक जिल्हाधिकाºयांनी केली गोदावरी पुलाची पाहणी

सहायक जिल्हाधिकाºयांनी केली गोदावरी पुलाची पाहणी

ठळक मुद्देठराविक वेळाने वाहने सोडण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गोदावरी नदीपुलावर रेती भरलेल्या अवजड ट्रकांची रांग राहत असल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी रविवारी गोदावरी पुलाला भेट देऊन पाहणी केली व कर्मचाºयांना निर्देश दिले.
तेलंगणाच्या बाजूने धरमकाटा उभारला आहे. या धरमकाट्यावर वेळ लागत असल्याने ट्रकांची रांग लागते, ही बाब ट्रकचालकांनी लक्षात आणून दिली. त्यामुळे धरमकाटा संचालकाने ट्रकांचे वजन करण्याची कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देश दिले. सिरोंचाच्या बाजूने महसूल विभागाचा नाका आहे. या नाक्यावरून काही वेळाच्या अंतराने पाच ट्रक सोडण्यात यावे, असे निर्देश दिले.
आरडा गावातून मोठ्या प्रमाणात ट्रकने रेतीची वाहतूक होत आहे. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी गावातील नागरिकांनी आंदोलनही केले होते. आरडा गावालाही सचिन ओंबासे यांनी भेट दिली. गावाच्या बाहेरून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, असे निर्देश दिले. वडधम ग्रामपंचायतीला सुद्धा भेट दिली. यावेळी तहसीलदार अतुल चोरमोर, मंडळ अधिकारी रमेश जसवंत उपस्थित होते.

Web Title: Inspector of Godavari Godavari Bridge survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.