केंद्रीय सहसचिवांकडून कामाची पाहणी

By Admin | Updated: June 10, 2015 01:56 IST2015-06-10T01:56:54+5:302015-06-10T01:56:54+5:30

आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ठाणेगाव ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या रोजगार हमीच्या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी मंगळवारी भेट देऊन कामाची पाहणी केली.

Inspection of work by Central Associates | केंद्रीय सहसचिवांकडून कामाची पाहणी

केंद्रीय सहसचिवांकडून कामाची पाहणी

ठाणेगाव : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ठाणेगाव ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या रोजगार हमीच्या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी मंगळवारी भेट देऊन कामाची पाहणी केली.
ठाणेगाव ग्रामपंचायत अंतर्गत मामा तलावाचे खोलीकरण, सिंचन विहीर, पांदन रस्त्याचे काम केले जात आहे. या कामावर गावातील शेकडो मजूर काम करीत आहेत. या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी अचानक भेट दिली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सहसचिवांनी प्रत्यक्ष कामाला भेट देऊन कामाचा दर्जा तपासला. यावेळी कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधून मजुरी वेळेवर मिळते की, नाही, मागणी केल्यानंतर तत्काळ रोजगार उपलब्ध होतो काय? किमान १०० दिवसांचा रोजगार मिळायला काय? आदी प्रश्न विचारले. रोजगार हमी योजनेच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेचे काम नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, रोहयो उपजिल्हाधिकारी पिंपळगावकर, उपविभागीय अधिकारी नान्हे, तहसीलदार वलथरे, संवर्ग विकास अधिकारी निमजे, उपविभागीय अभियंता गजगाटे शाखा अभियंता बन्सोड, पंचायत विस्तार अधिकारी देवारे, सरपंच गो. सा. मडावी, उपसरपंच लालाजी कुकुडकर, गोपाल भांडेकर, ग्रामविकास अधिकारी एल. टी. भांडेकर, ग्रा.पं. सदस्य गिरीधर कुनघाडकर, निकेश मडावी, तलाठी कुमरे, बालाजी मडावी, सूर्यकांता गजभिये, अनिता लक्षणे, सीमा उपरीकर, चंद्रशेखर किरमे, रोजगार सेवक रामेश्वर चिचघरे उपस्थित होते.

Web Title: Inspection of work by Central Associates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.